बारामतीत गणेश विसर्जनासाठी 26 ठिकाणी जलकुंभ घरोघरी येणार विसर्जन रथ

बारामती ः अनंत चतुदर्शीला गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम जलकुंभातच करावे, असे आवाहन मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी केले आहे. शिवाय बारामती शहरात घरोघरी विसर्जन रथ पोहचतील, त्यात मुर्ती विसर्जित कराव्यात असे आवाहन यादव यांनी केले. 
बारामती नगरपरिषदेमार्फत वाहनाद्वारे घरोघरी विसर्जन रथाची सुविधा उपलब्ध केलेली आहे.  नीरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच येणार असल्याने तेथे यावेळी गणेश मूर्ती विसर्जन करता येणार नाही. क-हानदी पात्राचे सुशोभिकरण प्रस्तावित असल्यामूळे क-हानदी पात्रातही विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे प्रदूषणमुक्त पर्यावरणाच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या  दृष्टिकोनातून शहरातील व उपनगरातील प्रत्येक प्रभागामधील शाळा-समाज मंदिरे या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंभाची व्यवस्था नगरपरिषद प्रशासनाने केली आहे.
गणेशभक्तांनी निर्माल्य व पूजेचे साहित्य निर्माल्य कलशामध्ये जमा करावे. गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम जलकुंभामध्ये करणे व गणेश मूर्ती नगरपरिषदेच्या कर्मचा-यांकडे द्यावी असेही यादव म्हणाले.
दरम्यान बारामतीत गेल्या दोन वर्षांपूर्वी गणेश मुर्ती विटंबनेचा प्रकार घडला होता. तसा प्रकार होवू नये, यासाठी पालिकेने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कर्मचाऱयांमार्फत पालिका मुर्त्या गोळा करत त्याचे सामुहीक पद्धतीने विसर्जन करू पाहत आहे. त्याएेवजी स्वयंशिस्तीचे पालन करत कोरोना पार्श्वभूमीवर आवश्यक ती खरबदारी घेत विसर्जनाला परवानगी द्यावी अशी मागणी नगरसेवक सुनील सस्ते, सतीश फाळके, सागर चिंचकर आदींनी पालिकेकडे केली आहे. 
———————-
या ठिकाणी असतील कृत्रिम जलकुंभ 
 धो.आ. सातव शाळा जगताप मळा, कसबा, बा.न.प. शाळा क्र.2, कसबा, महात्मा फुले समाज मंदिर पानगल्ली, बा.न.प.शाळा क्र.3 सिध्देश्वर गल्ली, क्षत्रिय नगर समाज मंदिर, टकार कॉलनी, शाहू हायस्कूल पाटस रोड, आर. एन. आगरवाल  हायस्कूल, बा.न.प. शाळा क्र. 5 शारदा प्रांगण, म.ए.सो. हायस्कूल, बारामती,  रमाई माता भवन, टेलीफोन ऑफिस समोर आमराई, मूक बधीर शाळा, कारभारी नगर कसबा,  जि.प. प्राथमिक शाळा, शारदा नगर,  चिंचकर शाळा, सपना नगर, जि.प. प्राथमिक शाळा तांदूळवाडी,जि.प.शाळा, जळोची क्षेत्रिय कार्यलयामागील,  सुर्यनगरी मंडई शेजारील अंगणवाडी, कविवर्य मोरोपंत शाळा, श्रीराम नगर, देसाई इस्टेट जि.प.शाळा, ढवाण वस्ती शाळा मोरगाव रोड,  रयत भवन मार्केट यार्ड, गावडे हॉस्पिटल शेजारी देवळे ईस्टेट मंगल कार्यालय, राजगड हाईटस् गाळा क्र. 4 व 5 फलटण रोड, जि.प.शाळा जुनी सातव वस्ती माळेगाव रोड,         जि.प.शाळा रुई,  विद्याप्रतिष्ठाण प्राथमिक शाळा रुई ग्रामीण हॉस्पिटल शेजारी,  तीन हत्ती चौक, बारामती
—————————————————————————————————–
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!