कृषीचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव करत आहेत आपल्याच गावात

कु.काजल राजेंद्र सस्ते सासकल येथील
शेतकऱ्यांना गादी वाफा तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविताना.
फलटण : ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड(रावे) कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरातील गावामध्ये
कृषीदूत व कृषीकन्या एकत्रित गट करून सहा महिने हा उपक्रम राबवत आसतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना स्वतः च्या गावात हा उपक्रम राबविण्याची संधी मिळाली आहे.
        महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, शरद कृषी महाविद्यालय जैनापूर(ता.शिरोळ) येथील चतुर्थ वर्षाची विद्यार्थीनी कु.काजल राजेंद्र सस्ते ही हा उपक्रम यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार फलटण येथे आँनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या मार्गदर्शनाने करत आहे.  सध्य स्थिती मध्ये हा 
कृषी कार्यक्रम योग्य पद्धतीने राबविण्याच्या सूचना संस्थेचे चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील  तसेच संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री .अनिल बागणे यांनी स्टाफला दिले आहेत.
 महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त  कृषी कार्यानुभव कार्यक्रम पार पाडला जात आहे.कार्यक्रम समन्वयक म्हणून प्राध्यापक संजय फलके तसेच कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा.सारीका कोळी ,प्रा. स्वप्नश्री गाट ,प्रा. धिरज पोवार  व प्रा. डॉ. नम्रता पाटील .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!