बारामती वृत्तसेवा :गुरुवार दि. 27 ऑगस्ट रोजी
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मधे काम करत असताना ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती ॲग्रो, भारतीय जैन संघटना,मॉडर्न कॉम्प्यूटर इंस्टीट्यूट, टेक्सटाइल पार्क बारामती, कॉटनकिंग बारामती, पु. ना . गाडगीळ ज्वेलर्स बारामती या संस्थांच्या वतीने सावंतवाडी मध्ये जलसंधारण कामे करण्यात आली होती.
यामुळे गावची घटलेली भूजल पातळी उंचावण्यास मोठी मदत झाली. यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा पवार यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले होते. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचे प्रतिनिधी सचिनजी खलाटे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबी 3 झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी कैलास सावंत, माजी चेअरमन विक्रम सावंत, सुरज सावंत, महेश सावंत, भीमराव सावंत, सुरेंद्र सावंत, वैशाली सावंत, योगिता सावंत, लक्ष्मीताई भापकर, सत्यभामा सावंत, आणि आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
गेल्या वर्षापासुन सावंतवाडी गावातील ग्रामस्थांनी प्रत्येक कुटुंबी 10 झाडे लावण्याचा मानस केला आहे. यामधे संगिता सरसेना आणि प्रिया कपाडिया ह्यांनी मोठा सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या ‘डीड्स फॉर नीड्स’ ह्या संस्थेच्या वतीने यंदा गावाला प्रथम टप्प्यात 1000 फळझाडांचे देण्यात आली आहेत. यामधे काजु, फणस, बदाम, पेरू, आवळा, रामफळ, जांभळ, बांबू, पिंपळ आणि चिंच ह्या फळझाडांचा समावेश होता. तर आत्ता ह्या दुसर्या टप्प्यात 500 फळझाडे तर 100 सावलीची झाडे देण्यात आली. यामधे नारळ आणि आंबा या झाडांचा समावेश आहे.