फलटण तालुक्यात ७८ ग्रामपंचायती बरखास्त ७७ ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी प्रशासक

       फलटण, दि.२७ : फलटण तालुक्यातील ७८ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कालावधी संपत असल्याने सदर ग्रामपंचायती बरखास्त करुन त्याठिकाणी मुंबई उच्चन्यायालयाच्या दि.१४ ऑगस्टच्या अंतरिम आदेशानुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच शासनाने काढलेल्या अधिसुचनेनुसार सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूका होईपर्यंतच्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून फलटण पंचायत समितीमध्ये कार्यरत असणार्‍या विस्तार अधिकार्‍यांची नियुक्ती केली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार तात्काळ स्विकारावा असे निर्देश दिले आहेत. या प्रशासकांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार जे अधिकार व कर्तव्य सरपंच व ग्रामपंचायतीस प्राप्त होतात ते अधिकार व कर्तव्य प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीस प्राप्त होतील असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
      फलटण तालुक्यातील विस्तार अधिकारी पंचायत *एम.एम.चौधरी* यांची बिबी, सोनगाव, नांदल, सस्तेवाडी, सांगवी, कांबळेश्‍वर, घाडगेवाडी या ७ ग्रामपंचायतीवर, विस्तार अधिकारी आरोग्य *आर.डी.झुंजार* यांची कोर्‍हाळे, वडगाव, मलवडी, फरांदवाडी, मुळीकवाडी, कापशी, शिंदेनगर, आळजापुर, वाघोशी या ९ ग्रामपंचातीवर, विस्तार अधिकारी कृषी *एल.एच.निंबाळकर* यांची कोळकी, खुंटे, भिलकटी, सोनवडी बु॥, सोनवडी खु॥, धुळदेेव, जाधववाडी (फ), तिरकवाडी, सासकल या ९ ग्रामपंचायतीवर, विस्तार अधिकारी कृषी *डी.डी.महांगडे* यांची वडजल, कुरवली बु॥, नाईकबोमवाडी, शेरेशिंदेवाडी, निंभोेरे, जावली, आंदरुड, घाडगेमळा या ८ ग्रामपंचायतीवर, विस्तार अधिकारी पंचायत *एस.जे.मोरे* यांची अलगुडेवाडी, शिंदेवाडी, मिरढे, धुमाळवाडी, झिरपवाडी, सरडे, बोडकेवाडी, निरगुडी, विंचुर्णी या ९ ग्रामपंचायतीवर, विस्तार अधिकारी शिक्षण *सी.जी.मठपती* यांची ठाकुरकी, काशिदवाडी, भाडळी बु॥, भाडळी खु॥, ढवळ, फडतरवाडी, ढवळेवाडी (निं), जिंती, वाखरी या ९ ग्रामपंचायतीवर, विस्तार अधिकारी पंचायत *आर.आर.भोसले* यांची हनुमंतवाडी, गुणवरे, पवारवाडी, मुंजवडी, निंबळक, राजुरी, टाकळवाडे, राजाळे, जाधववाडी (तां) या ९ ग्रामपंचायतीवर, विस्तार अधिकारी शिक्षण *ए.एन.संकपाळ* यांची पिंपळवाडी, कोरेगाव, रावडी बु॥, खराडेवाडी, होळ, मुरुम, खामगाव, रावडी खु॥ या ८ ग्रामपंचायतीवर, विस्तार अधिकारी पंचायत *एस.के.जमदाडे* यांची आरडगाव, तांबवे, तडवळे, डोंबाळवाडी, काळज, तावडी, कापडगाव, शेरेचीवाडी (हिं), हिंगणगाव या ९ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!