बारामती: प्रत्येक उत्सव साजरा करा पण त्या मागील पर्यावरण शास्त्र जाणून घ्या व पर्यावरणाशी मैत्री करा असे मैलीक सल्ला पुणे येथील पर्यावरण तज्ञ डॉ मीनल भोसले यांनी दिला आहे.
यावर्षी कोरोनाची एकंदरित परिस्थीती पाहिता अस वाटत होत की, कोरोनाच्या भितीने गणेशोत्सव साजरा करताना आनंदावर दगा येते की काय? लोक घाबरतील काय? पण वातावरणातला उत्साह पाहता या न दिसणाऱ्या व्हायरस पुढे लोकांनी भक्ती- श्रद्धेला जास्त झुकत माप दिल.. तितक्याच उत्साहात, जल्लोषात गणरायाच स्वागत केल.. हिंदु धर्म संस्कृतीप्रमाणे सण,उत्सव साजरे करण ही आपली परंपरा आहे.. आणि ती जपलीच पाहिजे या विषयी कोणत्याही स्वरुपाचे दुमत नाही…
परंतु हे करत असताना माणसाने माणसाशी जस माणूसकीने वागल पाहिजे तसच वैदिक सनातन धर्मानुसार माणसान निसर्गाला देव मानुन श्रद्धेन त्याची देखील काळजी घेतली पाहिजे…
पुर्वपरंपरेने चालत आलेल्या सण – उत्सवांना नैसर्गिक पार्श्वभुमी आहे… प्रत्येक सण निसर्गाशी जोडला गेलेला आहे.. पण या आधुनिक काळात सणांची संकल्पनाच पुर्णपणे बदलून गेली आहे…पूर्वी एक गाव एक गणपती संकल्पना होती . श्रद्धेतुन नंतर घरोघरी गणपती बसवले गेले… आता तर श्रद्धे बरोबरच मोठया मोठया मुर्ती, गणेशोत्सवाची वेगवेगळी आरास या गोष्टी काळाच्या ओघात आल्याच……
पुर्वी लोकसंख्या कमी होती व्रत वैकल्यांच्या प्रथा वेगळ्या होत्या.. पण आजच्या काळात निसर्गाचा विचार करता हे सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेण ही काळाची गरज आहे..
काही लोक म्हणतात हिंदु धर्माचे सण आले की तुम्हाला पर्यावरण निसर्गाच्या गोष्टी सुचतात का ? मला सांगा देशात इतर धर्मियांना विचार करता हिंदुची संख्या जास्त आहे ना ! मग पर्यावरणाची हानी आपल्याच कृतीने होणार ना ! मग काळजी आपणच घ्यायला नको का?
प्रत्येक निर्माण होणारा प्रश्न कायदयानेच सोडवला पाहिजे का ? समाज बांधिलकी म्हणून आपले काही कर्तव्य नाही का ?
मला वाटत शिक्षेपेक्षा समाजप्रबोधन हा मार्ग कधीही चांगला.. दिवाळीतल्या फटाक्याने ध्वनी आणि वायुप्रदुषण होत हे जेव्हा लहान मुलांना सांगितल ते०हा त्यांना ते पटल… याचाच अर्थ पर्यावरण संरक्षण संस्कार आता या नवोदित लहान पिढीवर घडण गरजेच आहे…
सभोवतालचा निसर्ग संप्पन असेल तरच माणसाला सुख समाधानाने जगता येईल. जोपर्यंत जगात पर्वत, उदयान, वन, सरोवर हे स्वच्छ आणि सुंदर टिकून राहतील तो पर्यंत आपली पुढची पिढी समाधानी राहिल..
वटपौर्णिमा आली की ‘अक्षरशः लोक वडाच्या फांदया तोडून आणतात.. गौरी गणपती आले की, शमी- आघाडा- हरळी- पाच फळांची पान-२ानहळद यासाठी वनस्पती झाडे अक्षरशः हा ओरबाडली जातात… जे झाड वाढायला वर्षानुवर्ष जातात ती आपण काही क्षणात उघडी बोडकी करतो…. मला सांगा देवाला पत्री अर्पण करुन देव प्रसन्न झालाय का?
कुणाच्या श्रद्धा दुखावण हा हेतू नाही माझा…. पण या श्रदधेचा त्रास पुढच्या पिढीला होणार असेल तर याचा विचार आताच व्हायला हवा….
गणेशोत्सवात मुर्तींसाठी मोठ्या प्रमाणावर पी.ओ.पी. वापरले जाते..पी.ओ.पी. झऱ्याच्या उगमस्थानी चिकटल की पाण्याचा स्त्रोत बंद होतो.. देशात एक महिन्यात जेवढ प्लॅस्टीक वापरतात तेवढ फक्त १० दिवसाच्या डेकोरेशन मधे वापरल जात.. यामधे असणाऱ्या थर्माकोल कड पक्षी आकर्षित होतात आणि ते खातात.. कितीतरी पक्षांच्या पोटात प्लॅस्टीक जात… अनंत चर्थुदशीला सागर किनारी किती भयाण स्थिती दिसते… दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लाखो मासे मृत अवस्थेत दिसतात….
मनाला विचारा एखादयाचा जीव घेवून धर्माच पालन करण आपल्या संस्कार संस्कृतीत बसत का ?
निर्माल्य, मुर्ती यांवर पाणी शिंपडल की विर्सजन होत अस शास्त्र सांगत… मग शास्त्राच पालन न करता आपण आपण कोणत्या आधुनिकतेच्या मागे धावत आहोत.. सध्य स्थितीत शाडुच्या मुर्तीची मागणी वाढत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. पण या प्रमाणात वाढ होण गरजेच आहे.. कालमानानुसार आपण गणेशोत्सव तसेच इतर सण साजरे करण्याची पद्धती बदलायला हवी….
उत्सव नात्यांचा, पर्यावरणाच्या रक्षणाचा हवा …..
तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मी या वर्षी को२ोनोच्या काळात गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करताना हे ज्ञान का सांगत आहे ….
पण लक्षात ठेवा कोरोना संपला की तुम्ही हे सगळ विसरताल. पुढच्या वर्षी चार पट उत्साहात सण साजरे करताल. . पण या कोरोना सारखे रोग निसर्गाच्या झालेल्या हानीमुळ होत आहेत हे लक्षात असु दया म्हणजे झाल असेही डॉ मीनल भोसले यांनी सांगितले.