सातारा, दि. 20 (जिमाका) : गणेश मुर्ती स्थापनेच्या दिवशी म्हणजे 22 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व देशीदारु किरकोळ विक्री (सीएल-3), बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-2), विदेशी मद्य विक्री (एफएल-2) परवानाकक्ष (एफएल-3), बिअरबार (फॉर्म -ई) व ताडी दुकान टिडी-1 या अनुज्ञप्तीची जागा व विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहेत. या आदेशाचे कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाने उल्लंघन केल्यास त्यांचे विरुध्द मुंबई मद्य निषेध कायदा 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमान्वये योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमुद केले आहे.