सातारा दि. 18 ( जि. मा. का) :महाराष्ट्र शासन कृषि विभाग,कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा अंतर्गत जिल्ह्यामध्ये शुक्रवार दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वाजता. तालुका कृषि अधिकारी कार्यालय, सातारा यांनी पुणे बेंगलोर हायवे शेजारी सातारा येथ. जिल्ह्यास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे. सध्या कोरोना पार्श्वभूमीवर कोव्हिड 199 च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन महोत्सवाचे अयोजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभज्यांची माहिती प्रचार व प्रसिध्दी प्रदर्शन तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यात येणार आहे. रानभाजी महोत्सवामध्ये रानभाजी विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. तसेच ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हाअधिक्षक कृषि अधिकारी, सातारा यांनी केलेआहे.