क्लाऊड मशीन द्वरे गरजूंसाठी 23 चाचण्या एकाच वेळी एकाच ठिकाणी हे वरदान ..डॉ अनिरुद्ध आठल्ये. डॉ.पेंढारकर यांच्या श्रीराम हॉस्पिटल येथे क्लाऊड मशीन चा उद्घाटन सोहळा संपन्न.

हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेडच्या क्लाउड मशीनचे शुभारंभप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये ,शेजारी डॉ अभिराम पेंढारकर डॉ सौ आर्या पेंढारकर,  डॉ, आमोद  पेंढारकर, अर्चना पेंढारकर. फोटो ..अतुल देशपांडे, सातारा  

सातारा.. विविध आजारांसाठी ,विविध चाचण्या करण्यासाठी आता मेक इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनखाली सुरू झालेल्या प्रकल्प खाली हिंदुस्तान एंटीबायोटिक्स चे क्लाऊड हे मशीन खरोखरच रुग्णांसाठी वरदान आहे .या मशीनमध्ये एकाच वेळी अगदी पाच मिनिटात होत असलेल्या 23 चाचण्यांमुळे रुग्णांवरील उपचारासाठी तातडीची सेवा आणि निदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय होत आहे हे खरोखरच अभिनंदनीय आणि स्तुत्य आहे असे उद्गार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी काढले.
 सातारा येथील सोमवार पेठेतील डॉ .अभिराम पेंढारकर यांच्या श्रीराम हॉस्पिटल येथे पश्चिम महाराष्ट्रात खाजगी रुग्णालयात प्रथमच हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडच्या वतीने उत्पादन करण्यात आलेल्या क्लाऊड तपासणी मशीन चा उद्घाटन सोहळा डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी वरील उद्गार काढले .
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष डॉ अच्युत गोडबोले ,सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक निखिल आरगडे, नगरसेवक अविनाश कदम, डॉ. वीरेंद्र घड्याळे, डॉ, आमोद पेंढारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले .
श्रीराम हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका आणि आहारतज्ञ डॉ .आर्या पेंढारकर यांनी या नव्या मशीन आणि उपक्रमाबाबत ची माहिती दिल्ली. या मशीन मध्ये त्वरित 23 चाचण्या अगदी अल्प किमतीत केल्या जात असून त्यामध्ये रक्तदाब, मधुमेह ,बॉडी मास इंडेक्स, वजन ,स्थूलता यासारखे चाचण्या आपल्याला करता येत आहेत .पेंढारकर परिवाराच्यावतीने गेली चार पिढ्या आरोग्यसेवेचे व्रत सुरू असून आता या मशीनद्वारे खऱ्या अर्थाने समाजाची आरोग्य सेवा अधिक त्वरेने करण्यात पेंढारकर कुटुंबीय राहतील असे त्यांनी सांगितले. डॉ. अभिराम पेंढारकर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
शुभेच्छा देताना नगरसेवक अविनाश कदम म्हणाले की नेहमी सामाजिक उपक्रमात डॉ .पेंढारकर अग्रभागी असतात आता सामान्य आणि गरजू नागरिकांना या मशीनच्या सहाय्याने त्वरित निदान करून चाचण्यांमधून उपाययोजना करणे सोपे जाईल .या नव्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो.

 डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी covid-19 च्या काळात सामाजिक आंतर तोंडाला मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करत हा रोग आपण लवकरच देशाबाहेर घालू असे सांगून क्लाऊड मशीनचा उपयोग आपण सर्वांनी तपासण्यासाठी करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्चना पेंढारकर यांनी केले .यावेळी डॉ .अजय साठे, कर सल्लागार हेमंत कासार, अविनाश पवार ,विभास नाईक, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स चे वितरक राजू माजगावकर , सुशांत नावंदर, श्री ,बेडेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
=========================


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!