चंद्रकांत चव्हाण-पाटील
बारामती:शनिवार दि.15 ऑगस्ट रोजी शहरातील हॉटेल ओम चे मालक चंद्रकांत चव्हाण- पाटील यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले (वय वर्ष 45) त्यांच्या पश्चात पाच भाऊ ,पत्नी व दोन मुली आहेत.विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य होते.बारामती नगरपरिषद च्या माजी नगरसेविका सुनीता चव्हाण – पाटील यांचे ते दीर होत तर बारामती वारकरी संपद्रय चे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण – पाटील यांचे ते लहान बंधू होत.
बारामती शहर व तालुक्यातील अनेक संस्था शी त्यांचा घनिष्ट सबंध होता जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर त्यांनी हॉटेल व्यवसाय नावा रूपास आणला होता रुचकर व स्वादिष्ट नाशता व भोजना साठी राजकीय,सामाजिक,शैक्षणिक ,क्रीडा आदी क्षेत्रातील नामवंत खास हॉटेल मध्ये भोजना साठी येत.त्यांच्या निधनाने हळहळ व्यवक्त होत आहे