दुःख देत ते आपले पण… जिथे आपलेपण आले तिथं दुःख आले…! प्रत्येकाने आपल्या दुःखाचा मर्यादा आणि काही परीघ ठरवले आहेत, परक्या लोकांचे वाईट वाटू शकते याला ही मर्यादा आहेत, तसे सोप सांगायला गेलं म्हणजे तुम्ही राम प्रहरी उठता अंघोळ करून निवांत चहा घेत वृत्तपत्र वाचत असता आणि तुम्हाला पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहलेले बातमी वाचता की काल रोड अपघातामध्ये दहा लोकांचा अपघात झाला.. आता या बातमी चे दुःख वाटण्या चे काही सीमा मर्यादा आहेत..म्हणजे एक माणुसकी किंवा एक समाजाचा भाग म्हणून तुम्हाला त्याची हुरहूर नक्की वाटेल पण ती बातमी वाचत असताना तुम्ही त्या नावांच्या यादी मध्ये बघता तर तुम्हाला समजते की यात आपलेच जवळचे नातेवाईका मधील दोन जण आहेत यावेळी होणारे दुःख हे खूप वेगळे असेल, ज्यावेळी तुम्ही दहा लोकांची बातमी बघता तेव्हा तुम्हाला इतके दुख होत नाही तुमचा मनात हेच येऊ शकतो की रोजच हजारो लोक मरतात त्यात याच तुम्हाला इतकं काही वाटणे साहजिक नाही पण आता तुम्हाला समजले की आपलेच लोक यात आहेत त्यावेळी होणारे दुःख नक्कीच त्रासदायक आणि वेदना देणारे असेल यामुळे नक्की अस वाटत की दुःख देते ते आपलेपण..जीवन आहे त्यात सुख दुःख आहे नक्कीच याला ही काही मर्यादा आहेत माणसाने कशाला किती महत्त्व द्यायचे याचे ही मापदंड घातले आहेत त्यात आपले पणाला जरा जास्त महत्त्व आहे… म्हणून सुखाला हजारो कारणे असतील पण त्रासदायक दुःखाला एकमेव कारण असू शकत ते म्हणजे आपलेपण, ज्या व्यक्तीला काहीवेळा पुर्वी दहा लोक मेल्याचे दुःख वाटत नव्हत त्याला समजल की त्या दहा मध्ये आपला एक आहे यात होणार त्याचे दुःख या दोन दुःखात नक्कीच जमीन अस्मानाचा फरक आहे..
जीवन एका चिमटीत आहे त्या चिमूटभर आयुष्यात खूप गोष्टी येतील जातील त्यामध्ये सुख दुःख तेवढेच आहे,पण यात दुःखाचे समीकरण जरा वेगळे आहे..!! क्षणभंगुर जीवन आहे त्याला कसे पायंडे पडून जगावं हे प्रत्येकाचा हातात आहे.. एकटे आलो आहे एकटे जाणार आहे,
एक सुंदर प्रमाण आहे
नाही रे नाही कुणाचे कुणी!
अंती जाशिल एकला प्राण्या माझे माझे म्हणोनी!
बहिण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगे सोयरे!
मेल्या मागे सर्व राहीरे, तुटतील धागे दोरे!
आयुष्यभर तू ज्यांचा साठी जगाला,ज्यांचा मनासारखा तू वागला शेवटी तीच लोक तुला दुःख देतील आणि शेवटी तुला एकट्याला जायचं आहे तुझा मागे सर्व पूर्वस्थितीत चालू राहणार आहे चार दिवस तुझे दुःख लोक व्यक्त करतील त्यानंतर तू माझे माझे म्हणणारा लोक तुला विसरून जातील आणि त्या जगासाठी तू स्वतः ला विसरला स्वतःला वेळ दिला नाही जीवन जगून घेतल नाही त्यामुळे आपलेपण जपत आता जगायला शिक सुख भोगून घे कारण हा देह नाशवंत आहे..!!
म्हणून वाटत की दुःख देते ते आपले पण….!!
– चेतन गवळी
MSW Student pune
खूप छान चेतन …..सोमनाथ भिले सकाळ पत्रकार डोर्लेवाडी
अप्रतीम लेख चेतन …पै.शुभम बोडरे सोनगाव
Thanks sir…!!
Mst…keep it up …
मस्त दादा…. बरोबर आहे तू बोला ते आपलेपण ….👍
Mstchhh 100% true …
Mast
अति सुंदर चेतन सर
Mast
Thanks All Of U ❤️
चेतन तू अगदी उत्तम लेख लिहिला आहेस..
मस्तच ������������
Khup chhan lekh ahe.
Mast Daji