डॉ.प्रियांका व डॉ.आशीष जळक यांच्या कडून शासकीय यंत्रणेस अँब्युलन्सची भेट… जळक कुटूंबियाची कौतुकास्पद सामाजिक बांधीलकी

बारामती: पत्नी च्या वाढदिवसाची भेट म्हणून डॉक्टर आशिष जळक यांनी रुग्णवाहिका आरोग्य यंत्रेनस भेट देऊन कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर पत्नीचा आत्मविश्वास वाढविला व त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर च्या 
 डॉ. प्रियांका जळक  चा  वाढदिवस खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.डॉ. प्रियांका कोवीड रुग्णालय रूई व उपजिल्हा रुग्णालय बारामती येथे कोरोना योद्धा म्हणून काम करत आहे तर पती  डॉ. आशीष जळक व त्यांचे    बंधू  डॉ. शशांक जळक हे सुद्धा त्यांचे दैनंदिन कार्य पाहून   कोवीड च्या आपत्तीच्या काळात सेवा  प्रदान करत आहेत.
मंगळवार 18 ऑगस्ट रोजी डॉ. आशीष यांनी  पत्नीला वाढदिवसाची भेट म्हणून डॉ. प्रियांका यांच्या शुभहस्ते आपल्या स्वतःच्या हॉस्पिटल ची सध्या चालू स्थितीतील  रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांच्याकडे भेट म्हणून सुपूर्द केली. या वेळी आय एम ए  च्या महाराष्ट्र राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समिती चे सदस्य डॉ. सुजीत अडसूळ यांनी 
या तरूण डॉक्टरांचा आदर्श महाराष्ट्रातील डॉक्टरांनी घ्यावा आणि शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. सदानंद काळे यांनी यावेळी जळक कुटूंबियांचे आभार मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!