महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय मुंबई व गट कार्यालय नांयगाव येथे १५ आॕगस्ट २०२० स्वतंत्र दिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यावेळी माननीय सौ.ज्योती मनोज माने संस्थापक -अध्यक्षा मुद्रा महिला बचत गट व माननीय श्री .सयाजी पाटील सहाय्य कल्याण आयुक्त मुंबई विभाग यांच्या शुभहस्ते ध्वाजारोहण करण्यात आला.यावेळी उपस्थित कामगारांना मास्क वाटप करण्यात आले.कामगार कल्याण अधिकारी श्री .संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल लोखंडे यांनी केले .श्रीधर पंडित व मृण्मयी मोडक यांनी सामाजिक अंतर व सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.