गोखळी वार्ताहार : ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गोखळी येथे आरोग्य सेविका व आशा सेविका या” कोरोना योध्दां “च्या यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
‘कोरोना संसर्गजन्य विषाणू साथीच्या काळात जिवाची पर्वा न करता. काम करणाऱ्या आशा सेविका सौ दुर्गा आडके यांच्या हस्ते ग्रामपंचायत गोखळी चे ध्वजारोहण करण्यात आले. आरोग्यसेविका सौ लोंढे मॅडम यांच्या हस्ते जि प शाळा गोखळी चे ध्वजारोहण करण्यात आले. आशा सेविका सौ.दनाणे मॅडम यांच्या हस्ते जि.प शाळा पंचबिघा (गोखळी)ध्वजारोहण करण्यात आले.आशा सेविका सौ त्रिवेणी घाडगे यांच्या हस्ते जि, प ,शाळा शांती दास नगर (गोखळी) चे ध्वजारोहण करण्यात आले. आरोग्यसेविका सौ शिंदे मॅडम यांच्या हस्ते खटकेवस्ती ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात आले, गोखळी सरपंच सौ सुमनताई गावडे यांच्या हस्ते जिल्हा म सहकारी बँक सातारा, शाखा गोखळी, चे ध्वजारोहण करण्यात आले, हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्कूल कमिटीचे अध्यक्ष बजरंग गावडे( सवई )यांचे हस्ते तर गोखळी सोसायटी चे व्हॉइस चेअरमन श्री रघुनाथ ढोबळे यांच्या हस्ते व हनुमान विकास सोसायटीचे ध्वजारोहन प्राचार्य डी.एन.भिवरकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आरोग्य विभागाच्या. अंगणवाडी विभागाच्या. व ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांना. गोखळी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.
यावेळी सरपंच सौ सुमनताई गावडे तंटामुक्ती अध्यक्ष मनोज तात्या गावडे. मार्केट कमिटीचे माजी संचालक राधेशाम भाऊ गावडे. गोखळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तानाजी बापू गावडे. व्हाईस चेअरमन रघुनाथ ढोबळे. माजी सरपंच रमेश दादा गावडे. त्रिंबक मामा बाराते. ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सर्व सदस्य. ग्राम विस्तार अधिकारी गणेश दडस. तलाठी गायकवाड अण्णा. व गोखळी ग्रामस्थ उपस्थित होते