सातारा दि.14 : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी शेखर सिंह जिल्हादंडाधिकारी, सातारा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियत 2014 चे कलम (37)(1)(3) अन्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यात 14 ऑगस्ट रोजीच्या सायं 6 वाजल्यापासून ते 15 ऑगस्ट रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी केले आहेत. पोलीस अधिक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही.