फलटण : वीर धरण शंभर टक्के भरले असून धरणातून नीरा नदीपात्रात २३ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे . पाच दरवाजे उचलण्यात आले असून ८०० क्युसेक्स पाणी वीजनिर्मिती प्रकल्पासाठी सोडण्यात आले असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी सांगितले
नीरा नदी धरण साखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून गुंजवणी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे व मोठ्या प्रमाणात पाणी नीरा नदी पात्रात येत आहे येत आहे त्यामुळेनीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे