फलटण तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या विविध मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे दिले.

फलटण प्रतिनिधी- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त फलटण तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या विविध मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे दिले.

धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कचेरीत विविध मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यात आले आहे. धनगर समाजाला घटनेने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या २२ योजनांची तात्काळ अंमलबजावणी करून त्यासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, मेंढपाळांनावर  सातत्याने होणारे हल्ले थांबवून त्यांना कायद्याने संरक्षण देण्यात यावे तसेच मेंढपाळांना चराऊ कुरणे व गायराध क्षेत्र  उपलब्ध करून देण्यात यावी. या प्रमुख मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन आज फलटण प्रांताधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आले.
   यावेळी फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजीराव बरडे तसेच निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे तसेच फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण तालुका दूध संघाचे माजी चेअरमन भीमदेव बुरुंगले, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन बजरंग खटके, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, भा.ज.पा. फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख बजरंग गावडे, फलटण तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विष्णुपंत लोखंडे, सातारा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे संपर्कप्रमुख खंडेराव सरक, राहुल पिसाळ, चंद्रकांत खटके, विजय भिसे, ऋषिकेश बीचुकले, निलेश लांडगे, संजय येळे, मारुती सांगळे,अक्षय सांगळे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
फोटो :- प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना निवेदन देताना धनगर समाज बांधव
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!