जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी व गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 14.69 मि.मी. पाऊस

सातारा दि. 13 ( जि. मा. का) : कोयना धरणात आज 73.61 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 73.52 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 58 नवजा येथे 101 व महाबळेश्वर येथे  120  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 7.46 (63.78), धोम -बलकवडी- 3.41 (86.05), कण्हेर – 7.33 (76.38), उरमोडी – 8.44 (87.48), तारळी- 4.32 (73.97), निरा-देवघर 6.91 (58.90), भाटघर- 16.69 (71.03), वीर – 9.20 (97.85)


 

*गेल्या 24 तासात जिल्ह्यात  एकूण सरासरी  14.69 मि.मी. पाऊस*

सातारा, दि. 13 ( जिमाका ) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  14.69 मि.मी. पाऊस झाला आहे.

            जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.

 सातारा 11.85  (528.13)  मि. मी., जावली – 27.35 (935.38) मि.मी. पाटण – 20.82 (891.63) मि.मी. कराड – 5.31 (405.69) मि.मी., कोरेगाव – 7.22 (359.50) मि.मी. खटाव – 3.59 (310.41)  मि.मी.  माण – 0.14 (278.00) मि.मी., फलटण – 2.56 (270.18) मि.मी. खंडाळा – 8.75  (320.25)  मि.मी. वाई – 12.00 (500.69) मि.मी.  महाबळेश्वर – 123.08 (3255.26)  याप्रमाणे आजपर्यंत एकूण  8055.10  मि.मी. तर सरासरी. 732.28 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!