सातारा दि. 13 ( जि. मा. का) : सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक विधंवाच्या पाल्यांना सन 2019-20 या या शैक्षणिक वर्षात शालांत परिक्षा इ.10 वी व इ.12 वी. बोर्डाच्या परिक्षेत गुण प्राप्त करुन उर्त्तीण झालेल्या एक-एक पाल्यांची निवड एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी करण्यात येणार आहे.अशा पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे विहित नमुन्यातील अर्ज दि. 20 सप्टेंबर 2020 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन विजयकुमार पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.