सातारा दि. 13 ( जि. मा. का) : जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सातारा यांचे मार्फत जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त दिनांक 15 ते 17 जुलै 2020 या कालावधीत पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्हयातील नामांकित कंपन्यानी भाग घेतला होता. सातारा जिल्हयातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टिने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होतो. या मेळाव्यामध्ये मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स अथवा टेलिफोन द्वारे घेण्याचे नियोजित करण्यात आले होते.
या मेळाव्यासाठी विविध प्रकारची 1765 पेक्षा जास्त पदे 20 उद्योजकांमार्फत अधिसूचित करण्यात आली होती. जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांचे मार्फत दिनांक 14 जुलै 2020 रोजी नोकरी इच्छुक उमेदवार व प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी बायोडाटा तयार करणे व ऑनलाईन इंटरव्युवला कसे सामोरे जाणे याबाबत ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यत 92 उद्योजकांमार्फत 282 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून काही उद्योजकांमार्फत मुलाखती घेण्याचे काम सुरु आहे. असे सचिन जाधव सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, सातारा यांनी कळविले आहे.