आसू प्रतिनिधी : दयाराम (बापू) बाबूराव शेडगे, वय वर्ष ७० यांचे बुधवार दि १२ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. दयाराम बाबूराव शेडगे हे आसू पंचक्रोशीत बापू या नावने परिचीत होते ते अत्यंत मनमिळावू व सतत हसतमुख असणारे असे व्यक्तीमत्त्व होते . तसेच आसूमधील सुदर्शन गॅस एजन्सीज् (भारत गॅस) चे ते मालक होते व ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी (आसू) स्कूल कमिटीचे ते विद्यमान सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले व दोन विवाहित मूली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.