जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अन्नधान्य वाटपाच्या सर्व योजनेचे लाभ लाभार्थ्यांना देण्याची दक्षता घ्यावी-छगन भुजबळ*

फलटण दुडे वृत्तसेवा :
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना  एपीएल  शेतकरी योजना   , 
  पंतप्रधान गरीब कल्याण योजना मोफत तांदूळवाटप 
 पंतप्रधान गरीब कल्याण योजना मोफत डाळ वाटप, आत्मनिर्भर भारत योजना या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना देण्याची दक्षता घ्यावी असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
        मंत्रालयात आज राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमवेत  श्री भुजबळ यांनी   व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागाचे अधिकारी व  सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी  विडोओ काॅन्फरन्स ला उपस्थित होते. 

श्री भुजबळ म्हणाले , लाॅकडाॅऊन च्या काळात आपल्या विभागाने चांगले काम केले आहे. स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे करावी  .अन्नधान्य वाटपाच्या तक्रारीची दखल क्षेत्रीय अधिकार्‍यांनी लगेच घ्यावी. नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून चांगल्या प्रतीचे धान्य वाटप करावे खराब धान्याचे वाटप करू नये. 
   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पुढे नागरिकांना धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु राहण्यासाठी काही अडचणी आल्या तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्या तत्काळ सोडविणे आवश्यक आहे. 
  विभागीय अधिकार्‍यांनी राज्य व केंद्र सरकारच्या अन्न धान्य वाटपाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवावा नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये याची दक्षता घ्यावी असे निर्देश ही यावेळी श्री भुजबळ यांनी दिले. 

     यावेळी लाॅकडाॅऊन काळातील सर्व अन्नधान्य वाटपाचा आढावा घेण्यात आला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!