सातारा दि. 7 (जि. मा. का) : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ची जिल्ह्यात कुठेही शाखा नाही आणि सातारा जिल्ह्यास राज्यातील 36 जिल्ह्यात केवळ एक अधिकारी जिल्हा विकास प्रबंधकाच्या (डीडीएम) माध्यमातून कार्य करते. कुठल्याही योजनेंतर्गत नाबार्डचा प्रत्यक्ष लाभार्थी बरोबर संबंध येत नाही. आणि नाबार्ड कुठलेही शुल्क अथवा कमीशन आकारत नाही. जिल्हा विकास प्रबंधकाव्यतिरिक्त जिल्ह्यात नाबार्डचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी पदस्थापित नाही, असे नाबार्डचे डी.डी.एम सुबोध अभ्यंकर यांनी कळविले आहे.