बारामती: बारामती तालुका विश्व वारकरी सेना युवा अध्यक्ष पदी तालुक्यातील गुणवडी येथील भारूडकार,कीर्तनकार व राष्ट्रीय पुरस्कार विजेते ह भ प शिवाजी शेळके यांची निवड करण्यात आली आहे व तालुका कार्यकारणी खलील प्रमाणे उपाध्यक्ष आकाश आटोळे,शुभम मेहत्रे सचिव वसंत धुमाळ,कार्याध्यक्ष शंकर जाधव,कोषाध्यक्ष अनिकेत जगदाळे,सहसचिव प्रवीण माने,संपर्क प्रमुख प्रेम पवार,तुकाराम राऊत,प्रवक्ता मोरेशवर खलाटे, सल्लागार पोपट बोराटे यांची निवड करण्यात आली आहे.
“वारकरी परंपरा जोपासली जावी व संताचे विचार तळागाळात पोहचवण्यासाठी आणि सामाजिक प्रोबधन करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्यरत राहू असे निवडीनंतर ह भ प शिवाजी शेळके यांनी सांगितले .