बारामती: पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी कपोते यांच्या मार्गदर्शना नुसार राखी पौर्णिमे निमित्त पोलीस बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम बारामती मध्ये संपन्न झाला.कोरोना सारख्या महामारी रोगाच्या काळात सर्व पोलीस बांधव एकजुटीने जीवाची परवा न करता जनतेच्या रक्षणासाठी सतत कार्यरत आहे,या सर्व गोष्टींचे भान राखुन व सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून व मिठाई वाटून संपन्न झाला .या वेळी पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य पुणे ज़िल्हा महिला अध्यक्ष _सौ शुभांगी चौधर_ यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता,यावेळी बारामती येथील इंदापूर तालुक्यातील जंक्शन पोलीस स्टेशन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक सदाशिव जगताप ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस निरीक्षक वीर पोलीस हवालदार शिंदे,वाघोले,पोलीस कॉन्स्टेबल निर्मळ साळवे हे उपस्थित होते.