असोसिएशन ऑफ डिजिटल मिडिया ॲन्ड इंडिपेंडण्ट न्यूज पोर्टल (ॲडमिन) संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी विनायक शिंदे यांची निवड

फलटण : असोसिएशन ऑफ डिजिटल मिडिया ॲन्ड इंडिपेंडण्ट न्यूज पोर्टल (ॲडमिन) संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी फलटण रक्षक डिजिटल पोर्टलचे संपादक विनायक जगन्नाथ शिंदे यांची निवड करण्यात आली असून सदर नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अद्वैत चव्हाण व सचिव महादेेव हरणे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे केली आहे.
असोसिएशन आफ डिजिटल मिडिया अॅण्ड इंडिपेंडण्ट न्यूज पोर्टल (ॲडमिन) ही देश पातळीवरील डिजिटल मीडियामधील एकमेव संघटना असून संस्थापक अध्यक्ष अद्वैत चव्हाण व सचिव महादेव हरणे यांंनी संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी, संघटक व जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी आज गुुरुवार दि. ६ आगस्ट रोजी फेसबुक लाईव्ह द्वारे जाहीर केल्या आहेत.
असोसिएशन ऑफ डिजिटल मीडिया अॅण्ड इंडिपेंडण्ट न्यूज पोर्टल (ॲडमिन) संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अद्वैत चव्हाण सायबर लॉ कन्सल्टंट असून देशभरात सुमारे 2000 हून अधिक वेब पोर्टलला मीडिया कन्सल्टंट म्हणून सेवा पुरवित आहेत.
असोसिएशन आफ डिजिटल मिडिया अॅण्ड इंडिपेंडण्ट न्यूज पोर्टल (ॲडमिन) संघटना कार्याध्यक्ष पदी (प्रशासकीय) जितेंद ठाकूर यांची, राज्य संघटक पदी रुपेश निमसरकार (चंद्रपूर), सैफन शेख (पश्चिम महाराष्ट्र), रामभाऊ लांडे (मराठवाडा) व नागरी भाग मेट्रो सिटी पोपटराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून संघटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणूून औरंगाबाद येथील उच्च न्यायालय येथे वकील म्हणून कार्यरत असलेले ॲड अविनाश आवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील सर्व पत्रकार यांचे अडीअडचणी प्रशासकीय पातळीवर सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी व हितासाठी असोसिएशन आफ डिजिटल मिडिया अॅण्ड इंडिपेंडण्ट न्यूज पोर्टल (ॲडमिन) संघटना कार्यरत राहणार आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय अमरावती येथे आहे.
आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील विनायक शिंदे हे गेली २५ वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेची सुरूवात दै. ऐक्य सातारा येथील फलटण विभागीय कार्यालय येथे सन १९९५ साली कै. सुरेशराव पळणिटकर, शरदराव पळणिटकर अरविंद मेहता व कै. दिलीप रुद्रभटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. सध्या दै. ऐक्यचे संपादक देवेंद्र पळणिटकर व शैलेंद्र पळणिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे कार्यरत आहेत.
दै. ऐक्य फलटण येथे पत्रकारितेबरोबरच जाहिरात, वितरण क्षेत्राची जबाबदारी विनायक शिंदे यशस्वीरित्या पार पाडीत आहेत.
विनायक शिंदे यांनी फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून २०१२ साली यशस्वीपणे काम पाहिले आहे. डिजिटल मिडियामध्ये विनायक शिंदे यांनी सन २०१८ पासून कामकाज करणेस सुरुवात केली. चंद्रपूर येथील मुक्तीवाद लाईव्ह एव्हीबी माझा फलटण प्रतिष्ठा न्यूज सांगली येथे काही काळ फलटण प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. काही काळ फलटण टुडे या साप्ताहिकाचे उपसंपादक म्हणून काम व नंतर डिजिटल मीडियामध्ये २०१९ साली पदार्पण केले.
पत्रकार दिनी दि. ६ जानेवारी रोजी साप्ताहिक फलटण रक्षक हे वर्तमानपत्र आपले सहकारी नानासाहेब मुळीक श्रीरंग पवार अशोक सस्ते व विनायक शिंदे यांनी सुरु केले असून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत असून त्याच दिवशी फलटण रक्षक डिजिटल पोर्टल सुरु करुन विनायक शिंदे हे मुख्य संपादक म्हणून डिजिटल मिडिया क्षेत्रात कार्यरत आहेत.
विनायक शिंदे पत्रकरीतेबरोबरच सहकार व शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे संचालक, सातारा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष, अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था सातारा जिल्हाध्यक्ष पदावर सध्या कार्यरत आहेत. ग्रामीण पत्रकार यांना एकत्रित करुन त्यांचे प्रश्न व अडचणी समजावून घेवून ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
विनायक शिंदे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील अनेक संपादक मालक पत्रकार व प्रतिनिधी यांचेसह सातारा जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक सहकार राजकीय धार्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
Share a post

0 thoughts on “असोसिएशन ऑफ डिजिटल मिडिया ॲन्ड इंडिपेंडण्ट न्यूज पोर्टल (ॲडमिन) संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदी विनायक शिंदे यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!