सातारा दि. 6 (जि. मा. का) : शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इ.10 वी, 12 वी, पदीव, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य (60 टक्के पेक्षा जास्त) गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणानुक्रमे उपलब्ध निधीच्या प्रमाणात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पां.भ. गिऱ्हे यांनी दिली आहे.
विशेष प्राविण्य मिळावलेल्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 22 अ जुनी एमआयडीसी रोड बॉम्बेरेस्टॉरंट चौक, सातारा येथे अर्ज करावा. अर्जासोबत छायाचित्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशबाबातचा पुरावा जोडावा असेही श्री. गिऱ्हे यांनी कळविले आहे.