गोळ्यांचे वाटप करताना नानासाहेब थोरात,जितेंद्र जाधव व इतर पदाधिकारी (छाया अनिल सावळेपातील)
बारामती: कोरोना च्या पार्श्वभूमीवर कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियाची प्रतिकार शक्ती वाढावी या साठी मंगळवार 4 ऑगस्ट रोजी श्रायबर डायनामिक्स डेअरी एम्प्लॉईज युनियन मार्फत सिलिंन च्या व्हिटॅमिन सी च्या गोळ्या 1500 कामगारांना वाटप करण्यात आल्या या वेळी युनियन अध्यक्ष नानासाहेब थोरात उपाध्यक्ष सौ रीना केकान कार्याध्यक्ष सुरेश कुचेकर खजिनदार अविनाश चांदगुडे व मनोज कारंडे
श्री मन्सूर सय्यद त्याच प्रमाणे प्लांट हेड जितेंद्र जाधव,बिझनेस सपोर्ट मॅनेजर मंजुषा चव्हाण, हनुमंत जगताप , प्रवीण आवटी , हेमंत चव्हाण , मुकेश चव्हाण , अजित वाळवेकर , अंकुश दरेकर ,आर के मिश्रा , चिंचमालातपुरे ,गिरवले आदी मान्यवर उपस्तीत होते. “कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कर्मचाऱ्यांचे सॅनिटायझरेशन केले जाते,तोंडास मास्क वापरणे सक्तीचे असून ,सोशल डिस्टन्स पाळून कंपनी मध्ये काम केले जाते त्याच प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियाची काळजी घेण्यासाठी सुद्धा कंपनी व संघटना विविध कार्य करत असते त्याचाच भाग म्हणून संघटना च्या वतीने सदर गोळ्या कर्मचारी व कुटूंबियांना वाटप करत असल्याचे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांनी सांगितले .आभार रीना केकान यांनी मानले