सरडे येथे अनोखे रक्षा बंधन साजरे

फलटण : सरडे ता फलटण येथे 16 जानेवारी  रोजी कै महेश शामराव भंडलकर याचे अपघातात निधन झाले होते .   त्याच्या घरची परिस्थिती एकदम नाजूक असल्या कारणाने त्याच्या परिवारावर आर्थिक संकट निर्माण झाले होते त्याची आई सतत आजारी असते तर वडील मोलमजुरी करून कुटुंब चालवतात बहीण नुकतीच 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाली, जानेवारी 2020 पासून घरात त्याची आई वडील आणि लहान बहीण एकत्र राहतात या अपघाता मुळे त्याच्या कुटुंबावर आर्थिक तसेच कौटुंबिक संकट निर्माण झाले होते ही परिस्थिती पाहता महेशच्या मित्र परिवार यांच्या ही गोष्ट लक्षात आली सर्व मित्र परिवार आपापल्या पद्धतीने आर्थिक मदत करू लागले व करत होते, आणि  कालचा दिवस हा श्रावण महिन्यातील पहिला सण रक्षा बंधन आला या सणाला सर्व मित्रपरिवार यांनी महेशची बहीण दुर्गा हिस तिच्या भावाची कमी वाटू नये म्हणून सर्वांनी राखी पौर्णिमा या सणाला तिच्या घरी जाऊन सर्व मित्रांनी तिच्याकडून राखी बांधून घेऊन राखी पौर्णिमा सण साजरा केला आणी तिला वचन दिले तुझा एक भाऊ गेला म्हणून काय झाले आम्ही सारे तुझे भाऊ तुझी शैक्षणिक आर्थिक व इतर कोणतीही अडचण आम्ही पूर्ण करू हक्कने आम्हाला सांगायचे असे तिला सांगितले या कार्यक्रमास सर्व मित्र बंधू श्री सागर चव्हाण श्री सचिन मदणे श्री हेमंतभैया आडके श्री अभिजित जाधव गणेश मदने ,धनंजय बोडरे, किरण जाधव अक्षय जाधव ,सुनील काळे, ओंकार जाधव, आकाश चव्हाण, उपस्थित होते

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!