राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील स्नेहल संजीव भोर प्रथम-श्री.गणेश तांबे

 फलटण : लायन्स क्लब ऑफ फल गोल्डन,लायनेस क्लब ऑफ फलटण व आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा रक्षाबंधन निमित्त अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाल्या.या काव्यस्पर्धेमध्ये 110 कवींच्या कविता सादर करण्यात आल्या होत्या,या मध्ये काही कविता  बेळगाव (कर्नाटक),दिल्ली येथून आल्या होत्या .या कवितांचे परीक्षण प्रसिद्ध कवी नवनाथ कोलवडकर सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करून पुढीलप्रमाणे निकाल जाहीर केला.
1सौ. स्नेहल संजीव भोर ता- खेड जि- पुणे (प्रथम क्रमांक )
2सौ सुचिता विजय कराळे( राजगुरुनगर पुणे)द्वितीय क्रमांक
 3.प्रा. ललिता वसाके जि- गडचिरोली 
(तृतीय क्रमांक)
4.श्री.ज.तु.गार्डे कापशी ता.फलटण    (तृतीय क्रमांक)

उत्तेजनार्थ 
1.अमोल शहाजी धुमाळ ता. बार्शी जि.
 सोलापूर 
2.प्रकाश सकुंडे (आसू)
3.अंजली शशिकांत गोडसे (जावली)
4.किशोर बळीराम चलाख जिल्हा चंद्रपूर  
5.श्रीमती कांता सोनवणे औरंगाबाद
6.लक्ष्मण नरुटे खंडाळा
7.जगदीश पुरोहित मसूर ता.कराड
8.विजय जमदग्नी-कोल्हापूर
9.मनीषा पवार नंदुरबार
शालेय गट उत्तेजनार्थ
 1.कु. समीक्षा नितीन कांबळे इ.७वी    सातवी जि.प.शाळा आसगाव इ.स्पर्धकांनी यश मिळवले
या स्पर्धेच्या नियोजनासाठी 
आमचे मार्गदर्शक मित्र फलटण नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती आदरणीय लोंढे पाटील सर 
त्याचप्रमाणे उज्ज्वला निंबाळकर मॅडम(अध्यक्षा लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन) नीलम लोंढे पाटील मॅडम(सेक्रेटरी लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन),मंगल घाडगे मॅडम
खजिनदार लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन, निलम लोंढे पाटील मॅडम
(अद्यक्षा लायनेस क्लब ऑफ फलटण,) नेहा व्होरा मॅडम(सेक्रेटरी लायनेस क्लब ऑफ फलटण),सुनंदा भोसले मॅडम
 (खजिनदार लायनेस क्लब फलटण)
 प्रा.जयश्री तांबे मॅडम,सचिव आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर,
अशा प्रकारच्या स्पर्धेमुळे प्रतिभावंत कवींच्या विचारांना चालना मिळते असे मत  ला.नीलम लोंढे पाटील यांनी व्यक्त केले तसेच अशा प्रकारच्या स्पर्धा आणखीन मोठया प्रमाणात आयोजित करू असे मत ला.उज्वला निंबाळकर यांनी मांडले.
   तसेच सर्व आयोजकांनी अतिशय सुंदर रित्या स्पर्धा नियोजन केले याचा मनापासून आनंद होत असल्याचे मत
आई प्रतिष्ठानचे अद्यक्ष श्री.गणेश तांबे यांनी व्यक्त केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!