बारामती : टी. पी.नारायण (वय वर्ष ५५ ) यांचे रविवार २ ऑगस्ट रोजी हृदय विकाराने केरळमध्ये निधन झाले.बारामती एमआयडीसी मधील शक्ती ग्रुप ऑफ इंड्रस्ट्रीज चे ते संस्थापक होते .बारामती मलायी असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स चे पदाधिकारी होते,बारामती व केरळ मधील विविध सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहुमूल्य योगदान होते.त्यांच्या पच्यात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. बारामती परिसरात यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची खास ओळख होते.टायर रोमोल्डिंग क्षेत्रात त्यांनी बारामती मध्ये प्रथम कार्य सुरू केले वयाच्या 13 व्या वर्षी बारामती मध्ये कामगार म्हणून कार्यास सुरू करून यशस्वी उद्योजक म्हणून काम करताना अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले .