फलटण : कोरोना काळात अनेक शिक्षक बंधू-भगिनी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. यामधीलच एक उपक्रम म्हणजे नितीन जाधव सर यांच्या शिष्यवृत्ती प्रश्नमंजूषा या उपक्रमाचे शंभर भाग आज पूर्ण झालेले आहेत. आणि या शंभर भागातून सुमारे १००० नावीन्य पूर्ण प्रश्नांची निर्मिती झालेली आहे.अतिशय नाविन्यपूर्ण वेगवेगळे प्रश्न हे दररोज नितीन जाधव हे तयार करून पाठवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना सद्याच्या कालावधीमध्ये पूरक अशी माहिती या प्रश्नमंजुषा उपक्रमातून मिळाली आणि त्यातूनच असंख्य विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढल्याचे आपणास दिसून येते. या प्रश्नमंजूषाचा उपयोग सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना झाल्याचा दिसून येतो.
नितीन जाधव सर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. जावली तालुक्यांमध्ये गेले अनेक वर्ष ते शिष्यवृत्ती तज्ञ मार्गदर्शक म्हणून यशस्वी भूमिका पार पाडत आहेत.नितीन जाधव सर म्हणजे शिष्यवृत्तीमधील एक तेजस्वी सूर्य म्हणावा लागेल. सतत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी असणारी धडपड,
नाविन्यपूर्ण प्रश्नांची शोधकवृत्ती यामुळे त्यांच्या हातून घडलेले अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चमकताना दिसत आहेत.गेले काही दिवसापूर्वीच तयार झालेल्या सुनील शेडगे सर लिखित “उपक्रमशील शिक्षक”या पुस्तकांमध्ये असणारा नितीन जाधव सरांचा लेख त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमास सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा तसेच आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरच्या वतीने पुढील कार्यासाठी शुभेच्छा!!!
श्रीमान नितीन जाधव सर उपक्रमशील शिक्षक या ग्रुपच्या पीचवर आपण प्रश्नमंजुषा सामान्यज्ञानाची खेळी लिहून शतक पूर्ण केलेत.त्याबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन🎖️❗💫
आपली प्रश्नमंजुषा सर्वसमावेशक ,जिज्ञासा वाढविणारी आणि मेंदूला चालना देणारी होती.काही प्रश्न सोपे तर काही विचार करायला उद्युक्त करणारे होते.उत्तर सोपं आहे पण आठवत नाही.यासाठी उद्याची वाट पहावी लागायची.या मालिकेमुळे आमच्या सामान्यज्ञानात भर पडली.आपणास पुनश्च धन्यवाद आणि पुढील डबल सेंच्युरीला मनापासून शुभेच्छा❗🌹🍫🎖️
This comment has been removed by the author.
Rajendra Kshirsagar
आदरणीय नितीन जाधव सर आपले हार्दिक अभिनंदन
नाविन्यपूर्ण प्रश्नांची शोधकवृत्ती यामुळे त्यांच्या हातून घडलेले अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चमकताना दिसत आहेत. यापुढे ही आपल्या हातून असेच कार्य घडो आपल्या या अभिनव उपक्रमाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
खूपच छान बातमी.लाॕकडाऊनमधील सुंदर व प्रेरक उपक्रम.सर्वांना खूप छान फायदा झाला.अतिशय छान छान विचारप्रवर्तक प्रश्न..!!अनेक शुभेच्छा..!!
आदरणीय संपादक,
फलटण टुडे..!!
मी नितीन जाधव.आज आपण शिक्षणवर्तुळातील बातमी देऊन मला व माझ्या आजची प्रश्नमंजुषा या उपक्रमाला प्रकाशझोतात आणलत.या लाॕकडाऊनच्या काळात या संधीचे रुपांतर सुंदर अश्या ज्ञानवर्धक उपक्रमात झाले.स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी म्हणून हा उपक्रम सर्वांना भावला व तो फलटण टुडे माध्यमातून सर्वत्र पोहोचला.आपल्या सुंदर शब्दांकनातून तो सूक्ष्मपणे अर्थपूर्ण झाला.
मनःपूर्वक धन्यवाद..!!
आपल्या साप्ताहिकास खूप खूप शुभेच्छा..!!
नितीन जाधव, सातारा
Whatever you doing is always best for others, congratulations and best wishes for working honestly