*लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन,लायनेस क्लब ऑफ फलटण*
*व*
*आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,
भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील अनोखा दिवस म्हणजे रक्षाबंधन.या *रक्षाबंधनानिमित्त काव्यलेखन स्पर्धा आयोजित करीत आहोत*…
*विषय : रक्षाबंधन* या विषयावरीलच कविता ग्राह्य धरल्या जातील.
*नियम आणि अटी*
▶ कविता स्वरचित असावी. काॅपी केलेली, चोरलेली कविता स्पर्धेत ग्राह्य धरली जाणार नाही.
▶ स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर एका स्पर्धकाने केवळ एकच कविता पाठवावी.
▶ कविता ही फक्त आणि फक्त मराठी भाषेतच असावी.
▶ कविता टाईप करून शब्दरूपी पाठवावी. फोटो, पीडीएफ फाईल, स्क्रिनशॉट नको.
▶ कवितेत कमीत कमी १६ ते जास्तीत जास्त २४ ओळी असाव्यात.
*कविता कशी पाठवाल?*
आपली शब्दरूपी कविता पाठवताना,
# कवितेचा विषय / शीर्षक
# १६ ते २४ ओळींची कविता
# कवीचे संपूर्ण नाव, गावाचे नाव आणि मोबाईल नंबर📲
या स्वरूपात पाठवावेत.
तसेच कविता
*श्री.गणेश तांबे 9890628720*
*या WhatsApp नंबरवर पाठवावी*.
*कविता पाठवण्याची अंतिम तारीख आणि वेळ*
रविवार दि 2.8.2020 रात्री 11पर्यंत. नंतर येणाऱ्या कविता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
सोमवार दि.3.8.2020 रोजी सकाळी १० वाजता सर्व सहभागी स्पर्धकांचा तात्पुरता एकदिवसीय WhatsApp ग्रुप तयार करण्यात येईल. तिथे सर्व स्पर्धकांच्या कविता प्रकाशित करण्यात येतील. आणि रात्री १o वाजता ग्रुपवरच निकाल जाहीर करण्यात येईल.
*बक्षिस स्वरूप*
कवितेची अर्थपूर्णता, विषयाला अनुसरून लयबद्ध लेखन आणि यमकपूर्ण मांडणी यांचे परीक्षण करून खालील प्रमाणे नंबर काढण्यात येतील.
🥇प्रथम क्रमांक : ५०० रू + ऑनलाईन प्रमाणपत्र 🖼
🥈द्वितीय क्रमांक : ३०० रू + ऑनलाईन प्रमाणपत्र 🖼
🥉तृतीय क्रमांक : २०० रू + ऑनलाईन प्रमाणपत्र 🖼
🏅उत्तेजनार्थ क्रमांक : १०० रू + ऑनलाईन प्रमाणपत्र
*विनंती : आपल्या संपर्कात असलेल्या साहित्य क्षेत्रातील मित्रांना आवर्जून पाठवावा ही विनंती…😊🙏🏻*