बारामती : राधेश्याम एन . आगरवाल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती या संस्थेतील विद्यार्थीनी कु. रोहिणी राम बोराटे रा . खंडोबा नगर, बारामती हिने दहावी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत 94 .80% गुण मिळवून ती राधेश्याम हायस्कूल मध्ये पहिल्या पाच मध्ये येऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
बारामती येथील प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश इलेक्ट्रीकल चे मालक प्रकाश बोराटे यांची पुतणी रोहिणी हिने हे दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. येथील राधेश्याम एन . आगरवाल हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज बारामती येथे शिक्षण घेतले असून तिचे वडील राम बोराटे हे येथील फळांचे व्यापारी असून आई सौ. माया बोराटे या गृहिणी असून. त्यांचे खंडोबा नगर येथे एकत्र मोठे कुटुंब असून तिला मार्गदर्शन तिच्या आई, वडील, मोठ्या बहिणींनी भावांनी व प्रिन्सिपल आणि वर्गशिक्षक, विषय शिक्षक यांनी केले असून तिच्या या यशाबद्दल राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .