फलटण : राधाकृष्ण हॉस्पिटल,टेस्टट्यूब बेबी सेंटर,दत्त आय केअर सेंटर व आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा सन-2020 आज उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातून 151 स्पर्धकाने भाग घेतला होता. यामध्ये जवळपास 50 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले.यामधूनच लकी ड्रॉ पद्धतीने क्रमांक काढण्यात आले यामध्ये कु.श्रावणी सुरेश पार्टे इयत्ता- सातवी,तालुका-जावली या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक,केदार जनार्दन गार्डे इयत्ता- सातवी द्वितीय-क्रमांक तालुका-फलटण, आदित्य अभयनंद विभुते इयत्ता-सहावी तृतीय क्रमांक तालुका- वाई. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ बक्षीस कु.तेजस्वी राजेश जगताप-खंडाळा,अपूर्वाअविनाशओंबासे- फलटण, विश्वाजली शशिकांत जमदाडे तालुका-वाई यांना मिळालेली आहेत. यशस्वी सर्व स्पर्धकांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे स्पर्धेचे बक्षीस लवकरच ऑनलाइन विजेत्यांना पोहोच करण्यात येणार आहेत.स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सामान्यज्ञानाची ओळख होत आहे, त्यामुळे अशा उपक्रमांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. तसेच या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे साहेब यांनीही कौतुक केले आहे.