सातारा दि. 31 (जि. मा. का) : इयत्ता 10 वी व 12 वी ,पदविका Diploma आणि पदवीत्तर शिक्षण शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या व पुढे शिक्षण घेत असलेल्या माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्ष 2020 -21 मध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचे मार्फत मंजूर करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी, माजी सैनिक विधवांनी आपल्या पात्र पाल्यांचे अर्ज दि. 15 ऑक्टोबर 2020 पुर्वी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा यांनी कळविले आहे.