सातारा दि. 31 (जि. मा. का) : “राखी ” हा यण भारतीय संस्कृतीत महत्वाचा उत्सव आहे ज्यात भावनिक आसत्की आहे. राखी टपालाची प्राधान्यक्रमांकानुसार बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था सातारा विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते कि त्यांनी आपली राखी मेल बॉक्स मध्ये पोस्ट करावी. तसेच पोस्ट ऑफिसने तयार केलेल्या विशिष्ट कव्हरचा उपयोग करता येईल व जलद गतीने पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचाही वापर करता येईल. ज्यांना आपण राखी पाठवीत आहात त्यांचा योग्य पिन कोड नंबर लिहिण्याची काळजी घ्यावी. त्यामुळे आपली राखी त्वरित वितरीत होण्यास मदत होणार आहे.
राखीचा सण येत्या 3 ऑगस्ट 2020 सोमवार असल्यामुळे सातारा पोस्टल विभागाने 2 ऑगस्ट,रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर विभाग,सातारा यांनी कळविले आहे.
00000