बारामती: मागील आर्थिक वर्षात 65 कोटी चा निधी बारामती शहरातील मध्यवर्ती बस स्थानक च्या नूतनीकरण करण्या साठी मागील आर्थिक वर्षात मंजूर
(फेब्रुवारी 2019 मध्ये ) झालेला आहे.त्या मुळे सोशल मीडिया व इतर माध्यमात ‘एसटी महामंडळ च्या बारामती विभाग निर्मिती साठी निधी आलेला आहे’ हे वृत्त चुकीचे आहे अशी माहिती एसटी महामंडळ पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली आहे.
बारामती एमआयडीसी मध्ये एसटी महामंडळ च्या अंतर्गत पुणे सातारा,सोलापूर जिल्यातील काही तालुके जोडून नवीन बारामती विभागीय कार्यालय ची इमारत व बारामती विभाग निर्माण करणे साठी एसटी महामंडळास ६५ कोटी चा निधी प्राप्त झाला आहे एकीकडे कामगारांना पगार देण्यास रक्कम नसताना बारामती विभाग ची निर्मिती करण्यासाठी निधी प्राप्त झाल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसारित झाल्या आहेत त्यामुळे कामगारां मध्ये नाराजी व असंतोष वाढला होता.
त्या पार्श्वभूमीवर यामिनी जोशी यांनी सांगितले की ” सद्या चे शहरातील बारामती बस्थानक मध्ये बसेस लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे त्यामुळे शेजारील नवीन जागा घेणे,नवीन अद्यावत बस स्थानक उभे करणे आदी कामा साठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मागील आर्थिक वर्षात निधी प्राप्त झाला आहे.”