बारामती: आई शेती मध्ये मजूर म्हणून काम करते तर वडील विविध चारचाकी वर बदली ड्रायव्हर म्हणून काम करत असलेले निरावागज येथील ड्रायव्हर दादासो काळे यांचा मुलगा हर्षवर्धन याने इयत्ता दहावी च्या परिक्षेत कोणतेही शिकवणी नसताना व घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या बळावर ९५.४०% गुण मिळवले आहेत. बारामती मधील कै गजाननराव देशपांडे विद्यालयात त्याने शिक्षण घेतले माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय भोसले यांचे शिक्षणा साठी सहकार्य केले तर शाळेतील मुख्यध्यापक व शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शन केले आहे.भविष्यात ग्रामीण भागातील वैदकीय क्षेत्रात काम करायचे आहे त्या साठी पुढील शिक्षण घेणार असल्याचे हर्षवर्धन काळे यांनी सांगितले.