सातारा जिल्ह्यात 31 ऑगस्ट पर्यंत सशर्त लॉकडाऊन जिल्हाधिकारी यांचे आदेश


    सातारा दि. 30 (जिमाका) : शासनाने राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व लॉकडाऊन उघडण्याचे आदेश पारित केलेले असून लॉकडाऊन कालावधी दि. 31 ऑगस्ट 2020 रोजीपर्यंत वाढविण्यात आला आहे.
    त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेलया अधिकारान्वये सातारा जिल्ह्यात दि. 1 ऑगस्ट 2020 रोजीच्या 00.00 वाजल्यापासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या 24.00 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करण्यात येत आहे.
    वय वर्ष 65 वरील व्यक्ती, persons with comorbidities, गर्भवती महिला, 10 वर्षा खालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा वगळता घरामध्ये रहावे. त्यांना बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.
सर्व चित्रपट गृहे, जिम, व्यायामशाळा, सर्व जलतरण तालाव, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.
रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असलेस किंवा  STANDRAD OPERATING PROCEDURE नुसार चालू राहील.
सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठ्या संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.
सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे  सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापि, नित्यनियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.
हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस बंद राहतील. ताथापि, सातारा जिल्ह्यातील रेस्टॉरंट यांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील दि. 18.5.2020 च्या ओदशातील अटी व शर्तीन्वये  खद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करणेसाठी परवानगी असेल.
सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्थ, प्रशिक्षण संस्था,, कांचिंग इन्स्टिट्युट या बंद राहतील. तथापि, शैक्षणिक संस्थांची कार्यालये (विद्यापीठ, महाविद्यालय,शाळा) कर्मचारी यांना शिक्षकेत्तर कामाकरीता परवानगी देण्यात येत आहे. त्यामध्ये ई-सामग्रीच्या विकासासह उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन व निकालाची घोषण समावेश राहील.
सार्वजनिक ठिकाणी दारु,पान, तंबाखु, इत्यादी सेवन करणेस मनाई करण्यात येत आहे.
सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील
    महाराष्ट्र शासनाने पवरनगी देण्यात आलेली सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना चालु ठेवण्या परवानगी देण्यात येत आहे. तसेच ओद्योगिक आस्थापनांना सुरु करताना कामगार व व्यवस्थापन यांचे वाहतुकीसाठी  कार्यान्वित केलेली वाहतुक यंत्रणा या कालावधीत चालू राहील. त्यात बदल करता येणार नाही.
    सुरक्षित शारिरीक अंतर व सफाई व्यवस्थेची खबरदारी घेऊन, विहीत केलेल्याप्रवासी क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने  जिल्ह्याअंतर्गत बस सेवा सुरु करण्यात परवानगी देण्यात येत आहे.
    आंतर राज्य व आंतर जिल्हा व्यक्तीच्या वाहतुकीस निर्बंध राहतील. 

व्यक्ती व वस्तुंच्या हालचालीबाबत विशेष सूचना
    सर्व प्राधिकारी यांनी मेडिकल प्रोफेशनल्स, नर्सेस आणि इतर मेडिकल स्टाफ , स्वच्छता संदर्भातील लोक  आणि ऍम्ब्युलन्स  यांना कोणत्याही प्रतिबंधाशिवाय राज्या अंतर्गत व राज्या बाहेर प्रवास करण्यास मान्यता द्यावी.

        सर्व प्राधिकारी  यांनी सर्व प्रकारच्या वस्तुंच्या आंतर जिल्हा, आंतरराज्य वाहतुकीस मान्यता द्यावी. यामध्ये ये-जा करणाऱ्या रिकाम्या वाहनांचा देखील समावेश असेल.
    शासकीय अधिकारी कर्मचारी यांना प्रवास करण्यास मान्यता द्यावी.
सातारा जिल्ह्यात सर्व वैयक्तीक व सार्वजनिक वाहतुकीस खालीलप्रमाणे परवानगी राहील
    दोन चाकी – 1 + 1 हेल्मेट व मास्क बंधनकारक राहील.
    तीन चाकी – फकत् अत्यावश्यक 1 +2  व्यक्ती, मास्क बंधनकारक राहील.
    चार चाकी – फक्त अत्यावश्यक 1 + 3 व्यक्ती  मास्क बंधनकारक राहील.
    सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते सायं. 7 वा. या वेळेमध्ये चालु राहतील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकारात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तात्काळ बंद करावीत.
    दि. 5 ऑगस्ट 2020 पासून सकाळी 9 ते सायं. 7 यावेळेत मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स चालू राहतील. तथापि, त्यामध्ये असलेले थिएटर चालू करणेस मनाई आहे. त्यामधील रेस्टॉरंटस्, फूड कोर्ट चे स्वयंपाकघरांना फक्त घरपोच सेवा पुरविण्याकरीता चालू ठेवण्यास परवानगी राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
    सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घाराच्या परिसराता 20 लाकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभाचे आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकार राहील. तसेच दि. 26.6.2020 च्या आदेशामधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकार राहील.
    अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत  (संपूर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करणेस परवानगी राहील.
    क्रींडागण, स्टेडियम व इतर  सार्वजनिक खुल्या जागेमध्ये प्रेक्षकांच्या  उपस्थितीशिवाय  व समुह विरहीत, सामाजिक अंतर ठेवून शाररीक व्यायाम व इतर क्रिया करण्यास परवानगी देण्यात येत आहे. 
    वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात येत आहे (घरपोच वितरणासह).
    केश कर्तनालय, स्पा, सलून, व्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्या कडील दि. 27.6.2020 च्या आदेशातील अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
    गोल्फ कोर्स आऊटडोअर फायरिंग रेंज, जिम्नॅस्टिक्स, टेनिस, मैदानी बॅडमिंटन आणि मलखांब अशा आउटडोअर (मैदानी) खेळांना 5 ऑगस्ट 2020  पासून शरीरिक अंतर आिा स्वच्छताविषक उपायांसह परवानगी देण्यात येत आहे.
    सातारा जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्याकडी दि. 11.6.2020 च्या आदेशातील अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी राहील.
    सातारा जिल्ह्यातील इंधन पंप व सर्व वैद्यकीय आस्थापना पूर्णवेळ चालु ठेवण्यास परवानगी आहे.
    अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारीयांनी अन्य कोणत्याही विशिष्ट, सामान्य आदेशाद्वारे परवानगी देण्यात आलेली कृती करण्यास परवानगी राहील.
    कोविड-19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खालील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकार असून पालन न झाल्यास दंडात्मक, फौजदारी कारवाईस  पात्र राहील.
    सार्वजनिक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहऱ्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीवर 500/- रु. दंड आकारावा.
    सातारा जिल्ह्यातील कोणत्याही सार्वजनिक अथवाखाजगी जागेच्या ठिकाणी थुंकरण्यास मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु. दंड आकारावा.
    दुकानामध्ये प्रत्ये कग्रामकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी. तसेच दुकानामध्ये कएावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. या आदेशाचे शहरी  भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/- दंड व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.
    जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
कामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील
    शक्य असले त्या ठिकाणी घरातून काम करण्यास प्राधान्या द्यावे.
    कामाच्या आणि व्यवसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिाकणी मार्केटमध्ये, आद्योगिक तसेच व्यावसायीक आथापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पध्दतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश, सॅनिटायझर याची एन्ट्री पॉईंट व एक्झीट पॉईंटवर व्यवस्था करावी.
    कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व समान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जाग  व वस्तू  यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करण्यात यावे.
    सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलण्याचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीच्या वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकार आहे.
    आरोग्य सेतू ॲपचा वापर – जिल्ह्यातील सर्व नागकिांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू  या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी  अद्ययावत करणे बंधनकार राहील.
    मुख्य सचिव, महसूल व वनविभाग,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, यांच्याकडील सुचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकार राहील.
    ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचे अधिकार  इन्सीडंट कमांडर म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. संबंधित कंटेन्मेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेशकाएून त्या झोन मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधीत राहतील याबाबत सर्वांना सूचित करतील. हा आदेश कंटेन्मेंट झोन वगळता सातारा जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी लागू राहील तसेच कंटेन्मेंट झोन बाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सीडंट कमांडर यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच केंटेन्मेंट झोन इनॲक्टीव्ह झाल्यानंतर त्या क्षेत्राला हे आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सीडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने  कंटेन्मेंट झोन जाहीर करुन वेगळा आदेश काढून त्या झोन मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबबात सर्वांना सूचित करतील.
    कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला, या आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करुन किंवा नवीन आदेश पारीत करुन या आदेशाच्या विसंगत कोणताही  आदेश, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचे पूर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही.
    या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, यांच्याकडील 29.7.2020 मधील Annesure १११ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भरतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!