बारामती: वन विभागाच्या नर्सरी विभागात पुन्हा कामावर घ्या म्हणून सुरू असलेले वनविभागा तील वन मजूर महिलांचे उपोषण अखेर सोडवण्यात प्रशासन ला यश आले आहे
दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षने आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर वनविभागाने महिलांच्या मागण्या लेखी स्वरुपात आश्वासन देऊन मान्य केल्या आहेत अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष ऍड अमोल सातकर यांनी दिली.
बुधवार दि.29 जुलै रोजी दिवसभर पुणे वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक वैभव भालेराव याच्याशी फोन वरून संपर्क करून महिला उपोषणाला बसल्याची माहीती देऊन आज 3 दिवस झाले तरी तुमचा कोणी आधीकारी त्याच्या कडे साधा फीरकला देखील नाही, उपोषणकर्ते महिलांना काय झाले तर सर्वस्वी जबाबदार वन विभागाकडे राहील व राष्ट्रीय समाज पक्ष तिव्र स्वरूपाचे अंदोलण करण्यात येईल असा इशारा देताच त्याची दखल घेत, राञी 11.30 वाजता सहायक वन संरक्षक वैभव भालेराव यानी लेखी पञ दिले या मध्ये दि 5/8/2020 पासुन कामावर रुजू होण्यासाठी विनंती केली आहे असेही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
महिलांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण प्रमुख विद्या नवनाथ जमदाडे व इतर महिलांना ज्युस देऊन उपोषण मागे घेण्यात आले. या वेळी पुणे विभागाचे प्रमुख,रासप चे तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर , वनविभागाने भाऊसाहेब गणेश रणवरे, कामगार संघटनेचे अध्यक्ष चव्हाण साहेब डाॅ.नवनाथ मलगुंडे, शैलेश बागडे,रमेश मासाळ, नवनाथ जमदाडे ,बाळू जमदाडे, विजय फरांदे,आप्पा जमदाडे, व वनविभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते
चौकट
सद्या नर्सरी मध्ये काम नसल्याने वनविभागात इतर ठिकाणी काम देणार असून निधी उपलब्ध होताच अनुदान देणार असल्याची माहिती सहायक वन संरक्षक वैभव भालेराव यांनी सांगितले.
चौकट महिलांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या आहेत त्या प्रमाणे प्रशासनाने वागावे अनुदान द्यावे व नियमित काम द्यावे अन्यथा या पेक्षा तीव्र उपोषण करू असेही उपोषण कर्त्या विद्या जमदाडे यांनी सांगितले
फोटो ओळ उपोषण सोडवताना वैभव भालेराव,अमोल सातकर व महिला