आंतरराष्ट्रीय दर्जाच्या योगशिक्षणाची सुवर्ण संधी* *बारामतीमध्ये प्रथमच सुरु होतंय योग महाविद्यालय

बारामती: शैक्षणिक वर्ष २०२०-२१पासून महाराष्ट्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान परिषदेच्या (युजीसी) मान्यताप्राप्त कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्नित बारामतीतील पहिल्या योग महाविद्यालयात योगशास्त्र विषयातील बी .ए (योग ) व एम .ए (योग ) हे अभ्यासक्रम राबविण्यात येणार  आहेत. बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद  फाउंडेशन व इन्स्टिट्यूट ऑफ रूरल पेडियाट्रीक (बाल कल्याण केंद्र) यांच्यावतीने हे अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहेत. 
       आरोग्य टिकविण्यासाठी व निरामय जीवन जगण्यासाठी आजच्या आधुनिक युगामध्ये योगसाधनेची नितांत आवश्यकता आहे, योगशास्त्राचा उपयोग  शारीरिक ,मानसिक व अध्यात्मिक स्तरावर आहे, त्यामुळे याचा सखोल व सर्वांगीण सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे,  यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरु केला आहे , अशी माहिती डॉ अनिल मोकाशी यांनी दिली. 

       आज संपूर्ण जग योगशास्त्र कडे चिकित्साशास्त्र म्हणून पाहू लागले आहे, त्यामुळे भारतीय योगशास्त्राची मागणी प्रचंड वाढली आहे, भारतीय संस्कृतीविषयी पाश्चात्त्य देशांमध्ये प्रचंड कुतूहल आहे,  त्यातील विषय, विज्ञान तत्वज्ञान याविषयी त्यांना आवड आहे,  त्यामुळेच भारतीय शास्त्रांची सांगोपांग माहिती असणार याची निकड भासू लागली आहे.  त्यामुळे योग विद्या शास्त्र, वेदशास्त्र, संस्कृत पंडित यांची मागणी वाढतीच राहणार आहे योगशास्त्र हे केवळ आसनात पुरतेच मर्यादित नाही आसनांच्या पलीकडेही योगाचा अथांग सागर आहे. बारामती सारख्या ग्रामीण भागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे योग शिक्षण मिळावे व त्या द्वारे उत्तम योग शिक्षक तयार होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी कार्य करावे ,यासाठी आम्ही प्रयत्न शील आहोत. याचाच एक भाग म्हणून हे योग महाविद्यालय आम्ही सुरु केले आहे. अशी माहिती योगाचार्य डॉ निलेश महाजन यांनी दिली . 
**अभ्यास पूर्ण केल्यावर नोकरीची ची संधी* 
          हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्र, जिम किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये योगशिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते किंवा स्वतःचा योग वर्ग , योगा स्टुडिओ सुरू करू शकतो,  केंद्र सरकारच्या नव्याने येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषयाचा समावेश करण्यात येणार आहे यामुळे विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योगअध्यापक म्हणून नियुक्ती होऊ शकते. योग शास्त्र हे एक चिकित्सा शास्त्र म्हणून पुढे येत आहे त्यामुळे आरोग्य क्षेत्रातही कार्य व संशोधन करण्यासाठी खूप मोठी संधी आहे , त्यामुळे सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा. भारत सरकार तर्फे ही योगशास्त्राचा प्रचार व प्रसारासाठी विविध योजना राबविल्या जातात यामुळे

योगशास्त्राच्या प्रसाराला गती मिळाली आहे, त्यामुळे योग शास्त्र या विषयांमध्ये ही आपण चांगले करिअर करून स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतो. त्यामुळे पारंपरिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये योग शास्त्र विषयातील बी .ए (योग ) व एम .ए (योग ) हि शाखा फायदेशीर आहे . प्रवेश घेण्यासाठी बी .ए (योग ) यासाठी कोणत्याही शाखेतुन  १२ वी पास व एम .ए (योग )साठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे.अशी माहिती योगतज्ञ डॉ भक्ती महाजन यांनी दिली.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!