फलटण : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून असाध्य ते साध्य करण्याचे उत्कृष्ट कार्य करणारे कवठे पिराणचे सुपुत्र हिंदकेसरी मारुती माने भाऊ यांनी केले
हिंदकेसरी मारुती माने भाऊ यांनी कला ,क्रीडा, शैक्षणिक ,संस्कृतिक, राजकीय, क्षेत्रामध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामान्य यातून असामान्यापर्यंत अत्युच्च शिखरा पर्यंत पोहोचण्याचं अतुलनीय कार्य केलेले आहे
आणि आजच्या युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या वर्तमान मध्ये मनापासून कठोर परिश्रम केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणून युवकाने जिद्दीने कार्य करावे
माननीय भाऊ कवठे पिराणचे सुपुत्र घरची परिस्थिती बेताची परंतु भाऊनी परिस्थितीचा बाऊ न करता काबाडकष्ट करून व मैदनी कुस्ती मधील येणार्या पैस्यातून आपला कुस्ती पेक्षा जपला
*कुस्तीमध्ये सर्वसाधारण गरीब मध्यम घरची मुले असतात आणि त्यांच्यापुढे खुराकाचा फार मोठा प्रश्न उभा असतो*
*त्यांच्यासाठी हिंदकेसरी मारुती माने भाऊ यांचा आदर्श महत्त्वाचा आहे तो त्यांनी घ्यावा*
त्याचप्रमाणे कुस्ती बरोबरच त्यांनी प्रेक्षक ,वस्ताद ,कोचेस, यांची मने जिंकली आणि खास करून कवठेपिरान चे सर्व ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि त्यांच्या *जडणघडणीमध्ये कवठेपिरान ग्रामस्थांच महत्त्वाचं योगदान आहे*
कवठेपिराण पासून आपण दिल्ली म्हणतो परंतु त्यांनी
आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती मध्ये *आॅलंम्पिक 1968 टोकियो सहभाग*
*जाकार्ता एशियन गेम एक सुवर्ण ,एक रौप्य पदक*१९६२
*हिंदकेसरी पद* १९६०
*जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग*
*तसेच दिल्ली च्या एका रोडला त्यांचं नांव दिले आहे*
*मोठं मोठी मैदानी कुस्तीमध्ये भारतासह, पाकिस्तान, मधील मल्लांना चीत करण्याचा कौशल्य केले*
आदरणीय भाऊनी त्याचबरोबर
*भारतीय कुस्ती महासंघाचे पदाधिकारी राहीले*
*महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले*
*राजकारणामध्ये खासदार ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ,वसंत दादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन*
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांना त्यांच्या वरील कार्याचा गौरव म्हणून
**महाराष्ट्र शासनाने छत्रपती जीवन गौरव*
*भारत सरकारने त्यांना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित केले आहे*
असे भाऊ त्यांच्याबद्दल लिहायला घेतल तर एक पुस्तक सुद्धा अपुरे पडेल परंतु त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन *आपल्या डोळ्यासमोर उच्च ध्येय ठेवून मनापासुन कठोर परिश्रम केल्यास तुम्ही तुमच्या ऐच्छिक ध्येयापर्यंत निश्चित पोहोचाल*
हिंदकेसरी मारुती माने भाऊ कुस्ती क्षेत्रातील आम्हा सर्व पैलवानांचे दैवत आहेत आणि खास करून माझ्या जीवनामध्ये माझ्या जडणघडणीमध्ये भाऊंचा सिंहाचा वाटा आहे
*भाऊ माझे प्रेरणास्थान आहेत त्यांचा आदर्श घेऊन मी माझ्या जीवनामध्ये इतपासून इथपर्यंत पोहोचलो आहे*
आज त्यांचा दहावा स्मृतिदिन ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो त्यांना भावपूर्ण आदरांजली
*झाले बहु होतील बहु परंतु या सम हा*
*हिंदकेसरी मारुती माने भाऊ*
पै सुशांत निंबाळकर
अधक्ष भाजप फलटण ता जि सातारा
फलटण ता कुस्ती सघ सातारा