फलटण : सीबीएससी बोर्डाच्या वतीने 2019- 20 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल जाधववाडी सीबीएसई च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली.
कु. तनिष्का नाळे हिने 97.6% गुणांसह प्रथम क्रमांक तर
चि. अंकुश चौरे याने 97.4% गुणांसह द्वितीय क्रमांक
कु. मोनिका खलाटे – 95.8%
व
चि. नौमान तांबोळी- 95.8%
या दोघांनी तृतीय क्रमांक
कु. खराडे सई-95.6%
चि.देवकाते शंभुराजे 95.6%
या दोघांनी चतुर्थ क्रमांक
कु. यादव अनुष्का-95.4%
चि. बनकर अश्विन -95.4%
कु. शिंदे सिद्धी-95.4%
या तिघांनी पाचवा क्रमांक
पटकाविला.
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेमध्ये प्रशालेचा 100% निकाल लागला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!!!
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर चेअरमन फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तसेच. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण व चेअरमन स्कूल कमिटी. तसेच व्हाईस चेअरमन श्री रमणलाल दोशी आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल , बोर्ड ऑफ ट्रस्टी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी मेंबर, प्रशालेच्या प्राचार्य सौ दीक्षित मॅडम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…..