बारामती: सोमवार दि.२७ जुलै २०२० रोजी सकाळी ९ वाजे पर्यंत बारामती तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ची वाढ झाली आहे
बारामती येथे तपासणी झालेल्या एकूण नमुन्यांपैकी आज आलेल्या अहवालामध्ये चार जण कोरोनाबाधित झाले आहेत.
आज आढळून आलेले चारही कोरोनाबाधित पुरुष रुग्ण असून यामध्ये 29 वर्षापासून 59 वर्षापर्यंतच्या रुग्णांचा समावेश आहे. बारामती तालुक्यात आज अखेर 119 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले, त्यापैकी 62 जणांनी कोरोणावर मात केलेली आहे. वेगवेगळ्या सेंटर मध्ये व दवाखान्यात उपचार घेत असणारे रुग्ण 44 व घरी उपचार घेत असणारे २ रुग्ण असे एकूण 46 रुग्ण उपचार घेत आहेत व 11 रुग्णांचा मृत्यू आजअखेर झालेला आहे.
तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी केले आहे