बारामती: उत्कृष्ट सेवा व्यवस्थापन व गुणवत्ता मानक असलेल्या बारामती मधील पीसीएस फॅसिलीटी सर्व्हिसेस इंडिया प्रा.ली. यांचा चौथा वर्धापन दिन कोरोना च्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सरफराज शेख,संचालक अफरोज शेख,एच.आर. हेड इनासिओ परेरा, रिजनल व्यवस्थापक नितीन शहा आदी मान्यवर उपस्तीत होते. हाऊसकिपिंग,सपोर्ट सर्व्हिसेस, टेक्निकल सर्व्हिसेस व इतर अनेक प्रकारच्या सेवा बारामती,पुणे,मुंबई,नागपूर,कोल्हापूर,नगर,आदी ठिकाणी देत असून जवळपास सहाशे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक सरफराज शेख यांनी दिली .
सामाजिक भान जपत कोरोनच्या पार्श्वभूमीवर सदनिका, बंगला, कार्यालये व विविध कंपन्या, कारखाने यांच्या मागणी नुसार निर्जंतुकीकरण व स्वच्छता करून देत असल्याचे शेख यांनी सांगितले. वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला.आभार प्रदर्शन इनासिओ परेरा यांनी केले.