जलप्रदूषण करणाऱ्या टँकर चालकास पाठीशी घालण्याचा प्रयत्न

फलटण :- नीरा उजवा कालव्यातील पाण्यात
दूध टँकरमधील खराब झालेले दुषित दूध सोडून दिल्या प्रकरणी नीरा उजवा कालवा विभागाची भूमिका एकंदरीतच संशयास्पद वाटत असल्याने जलप्रदूषण करणाऱ्या टँकर चालक व मालक यांना नीरा उजवा कालवा विभागाचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
दि 23 जुलै रोजी फलटण पंढरपूर पालखी महामार्ग लगत राव रामोशी पुलाशेजारी असणाऱ्या नीरा उजवा कालव्यामधील पाण्यात एम.एच.११.ए.एल.५९०० या टँकरमधुन खराब झालेले दुध सोडण्यात पाण्यात सोडण्यात आल्यानंतर दूध टँकरमधून खराब दूध पाण्यात सोडताना फोटो व व्हिडिओ नीरा उजवा कालवा विभागास प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी अधिकाऱ्यांनी भेट देऊन या घटनेची खातरजमा केली. परंतु यानंतर घटनास्थळी पचनांमा करण्याची आवश्यकता असताना कोणताही पंचनामा केला नाही अथवा पोलीस ठाण्यात या गाडी चालक व मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला नाही.
या घटनेच्याबाबत नीरा उजवा कालवा विभाग उपकार्यकारी अभियंता श्रीरंग ठवरे यांच्याशी संपर्क केला असता एम.एच.११.ए.एल.५९०० या गाडीच्या मालकाचे नाव विकास धुमाळ असून या मालकांचा शोध घेत आहोत अनेक वेळा अश्या घटना घडतात अस बघत बसायचं म्हटलं तर अवघड होत, सोमवारी परिवहन विभागाकडून टँकर मालकांबाबत सविस्तर माहिती घेऊन बघू असे उत्तर जबाबदार अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे एकंदरीतच नीरा उजवा कालवा विभाग ही घटना गांभीर्याने घेत नसल्याचा व टँकर मालक तसेच चालकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या घटनेबाबत पंचनामा करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे नीरा उजवा कालवा विभागाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली असून सोमवारी या घटनेबाबत नीरा उजवा कालावा विभागाकडून कोणती पुढील कार्यवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!