आरोग्य तपासनीस प्रचंड प्रतिसाद
बारामती: पोलिसांची तपासणी होती तीही आरोग्य तपासणी सुंदर उपक्रम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील पोलिसांच्या रक्ताच्या तपासण्या तसेच छातीचा एक्स रे काढण्याचे काम आजपासून सुरु झाले. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारे रिपोर्टींग करुन ज्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे आहेत त्यांचे निदान या द्वारे होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील पोलिसांच्या रक्ताच्या तपासण्या तसेच छातीचा एक्स रे काढण्याचे काम आजपासून सुरु झाले. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सद्वारे रिपोर्टींग करुन ज्यांच्यामध्ये कोविडची लक्षणे आहेत त्यांचे निदान या द्वारे होणार आहे. बारामतीतील इंडीयन मेडीकल असोसिएशन व मेडीकोज गिल्ड यांच्या वतीने तसेच मंगल लॅबोरेटरीचे डॉ. पंकज गांधी, डॉ. राकेश मेहता व थिंकस्मार्ट आयटी सोल्यूशन्सचे नचिकेत गायकवाड यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरु केला आहे. अॅक्सिस बँकेने या उपक्रमाला आर्थिक सहकार्य देऊ केले आहे.
*अशी होणार तपासणी*
“एका बसमध्ये सर्व युनिट ठेवून या बसमध्येच पोलिसांची तपासणी करुन एक्सरे काढला जातो, अवघ्या पाचच मिनिटात त्याचा रिपोर्ट मिळत असल्याने ज्यांना कोविडची चाचणी करण्याची आवश्यकता आहे, अशांना तातडीने रिपोर्ट दिले जात आहेत. आर्टिफिशयली इंटेलिजेन्सच्या सॉफ्टवेअरची मदत घेत ही तपासण होती”
. पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांची तपासणी करुन या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. डॉ. विभावरी सोळुंके व डॉ. संजय पुरंदरे हेही या प्रसंगी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचा-यांची तपासणी या द्वारे केली जाणार आहे. अँक्सिस बँकेच्या वतीने योगेश हर्णे, वासुदेव ताम्हणकर उपस्थित होते. पुण्यातून अँक्सिस बँकेचे सर्कल हेड नरेंद्र गलानी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. पोलिसांनी सदर तपासणी बदल समाधान व आनंद व्यक्त केला