फलटण : साखरवाडी या ठिकाणी ६१ फळवृक्षांची लागवड करून सुरक्षित अंतराच्या
नियमांचे पालन करीत पार पडला. तसेच सर्व समाज कोरोनामुक्त झाला पाहिजे. मानवाने निसर्गाचा समतोल राखलेला नाही. वृक्षतोड करून निसर्गाचा -हास केलेला आहे. यामुळे येणाऱ्या काळात माणसाला याचा त्रास होणार आहे, हा धोका लक्षात घेऊन मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसादिवशी वृक्षारोपन करून एकसष्ठी साजरी करणे हा एक आदर्शवत उपक्रम आहे. मा. ना. अजितदादांना दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आपण करूयात असे मनोगत महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ, महानंदा डेअरी, मुंबई संघाचे व्हाईस चेअरमन डी. के. पवार यांनी केले.
यावेळी मा. डॉ. सोडमिसे, प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरवाडी, मा.शंकरराव माडकर, माजी सभापती, पंचायत समिती, फलटण, मा. विक्रम भोसले, सरपंच, साखरवाडी, मा. समीर भोसले, उपसरपंच, साखरवाडी मा. सतीश माने, अध्यक्ष, फलटण तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस, मा. आर. डी. भोसले, माजी व्हाईस चेअरमन, मातोश्री वि. का. सोसायटी,मा. सुनील माने, संचालक, फलटण तालुका सह. दुधसंघ, मा. आर. के. पवार, मा. ज्ञानेश्वर भोसले, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व इतर नागरिक उपस्थित होते.