फलटण – फलटण ते सातारा मार्गावर सकाळी सहा वाजता बस सुरू करण्यात यावी अशी मागणी अनेक दिवस प्रवाशांमधून होत होती.या बाबत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातुन ही सकाळची बस सुरू झाली आहे.
या मुळे अनेक बस सुरू करण्याची दिवसांची मागणी पूर्ण झाल्याने सर्व प्रवाशांनी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.गेली अनेक दिवस फलटण ते सातारा या मार्गावर सकाळी सहा वाजता बस सुरू करावी अशी मागणी करण्यात येत होती.मात्र पाठपुरावा कमी पडत असल्याने प्रवाशांनी ही गोष्ट खा.रणजितसिंह यांना संपर्क साधून या मार्गावर बस सकाळी सहा वाजता सुरू करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत खा.रणजितसिंह यांनी ताबडतोब बस सुरू करा असे पत्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभागास दिले व याबाबत पाठपुरावा केला. दरम्यान या नंतर लगेच ही फलटण- सातारा बस सुरू करण्यात आली असून खासदार यांच्या पाठपुराव्यामुळे कामगार वर्ग व इतर प्रवाशांची अडचन दूर झाली आहे.