फलटण – सातारा जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व मी स्वतः लक्ष घालीत असून आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा पराभव करायचा आहे. दरम्यान अधिकारी व त्यांचे सहकारी सोळा सोळा तास काम करीत आहेत. त्यांच्या सूचनांचे पालन करा असे आवाहन राज्याचे गृहराज्य मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले आहे.या वेळी त्यांचे सोबत आ.दीपक चव्हाण उपस्थित होते.
प्रशासनास सहकार्य करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
ते फलटण येथे कोरोनाचे वाढते रुग्ण कमी कसे करायचे व त्यासाठी कोणती उपाययोजना आखायची या बाबत चर्चा करण्यासाठी आले होते.या वेळी ते बोलत होते. दरम्यान या वेळी पत्रकारांनी विचारले की मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारची भूमिका काय आहे? या वेळी ना.देसाई यांनी सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,ना.एकनाथ शिंदे,ना.अशोकराव चव्हाण, हे मराठा आरक्षण टिकावे या साठी प्रयत्न करीत असून काही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण देणारच असे ना.देसाई यांनी सांगितले या साठी राज्य सरकारने मोठ्या वकिलांची फौज तयार ठेवली आहे.
सध्या राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,व आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी धारावी पॅटर्न राबविण्यात येत आहे. त्याच बरोबर आमचे सर्वच अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोळा सोळा तास काम करावे लागत आहे.या मुळे त्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करा.योग्य ती खबरदारी घ्या.मास्क वापरा.सॅनिटायझर चा वापर करा.विनाकारण गर्दी करू नका.असे आवाहन ना.देसाई यांनी जिल्हा वासीयांना केले आहे.
फलटण तालुक्यात झपाट्याने वाढत असलेले रुग्ण ही चिंतेची बाब आहे.असे ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले या मुळे काही अडचणी असतील तर मला सांगा मी पाहिजे ती मदत करतो मात्र कोरोनाचा आकडा कमी करा किंवा शून्यावर आणा असे स्पष्ट निर्देश देत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे तोंडभरून कौतुक ही केले.या वेळी व्हेंटिलेटरवर, औषधे,बेड्स याची माहिती घेतली व काही सूचना केल्या.
या वेळी कोरोनाची सध्य स्थितीचा आढावा प्रांताधिकारी डॉ.शिवाजी जगताप यांनी दिला आत्तापर्यंत १९३ रुग्ण बाधित असून,१०६ जण कोरोना मुक्त झाले आहेत.९ बधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण कंटेन्मेंट झोन ७४ असून,३२ ठिकाणी २१ दिवस पूर्ण झाले आहेत. तर ४२ ठिकाणी अजून कंटेन्मेंट झोन असून सातारा येथे ३,कराड येथे १,तर ५२ कोविड केअर सेंटर मध्ये ५२ व उपजिल्हा रुग्णालयात मध्ये २२ जण दाखल करण्यात आले आहेत.असे एकूण बाधित रुग्ण १९३ असल्याचे जगताप यांनी सांगितले. या वेळी तहसीलदार आर.सी.पाटील,गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे,मुख्याधिकारी प्रसाद काटकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. व्हि. व्हि. पोटे,डॉ.गायकवाड यांचे सह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
[23/07, 9:11 pm] Press Vikram Chormale: फलटण (प्रतिनिधी) :- पुर्वीच्या भांडणाचा राग व कोर्टात दाखल असले केसमध्ये कोर्टाने जामीन दिल्याचा राग मनात धरुन आठ जणांनी फडतरवाडी येथील एक जणांस तलवार,गज,कोयत्यांने गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या बाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.18 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मौजे फडतरवाडी ता.फलटण जि.सातारा गावचे हददीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर गोरख फडतरे यांचे किराणा मालाचे दुकानाशेजारी पुर्वीचे भांडणाचे कारणावरुन कोर्टात दाखल असले केसमध्ये कोर्टाने जामीन दिल्याचा राग मनात धरुन रमेश पांडुरंग फडतरे वय 55 वर्षे, संजय पांडुरंग फडतरे वय 53 वर्षे, राजेंद्र पांडुरंग फडतरे वय 50 वर्षे, शैलेश रमेश फडतरे वय 32 वर्षे, गणेश रमेश फडतरे वय 30 वर्षे, आकाश संजय फडतरे वय 23 वर्षे, नागेश कैलास जाधव वय 30 वर्षे, कैलास बापुराव जाधव वय 55 वर्षे सर्व राहणार फडतरवाडी ता.फलटण जि.सातारा यांनी आपसात संगनमत करुन संतोष फडतरे हे मोटार सायकलवरुन शेताततुन घरी येत असताना त्यांना रोडवर वाहने आडवी लावून संतोष फडतरे यांना तलवारी , गज , कोयत्याने डोक्यात दोन्ही हातावर तसेच अंगावर वार करुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वरील आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद बाळासो फडतरे राहणार फडतरवाडी यांनी दिली असून या गुन्ह्याचा तपास सा.पो.नि.नागटीळक करीत आहेत.